मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मारहाणीचे व्हिडीओ न काढण्याचे आदेश दिले होते. मात्र, विक्रोळीत एका दुकानदाराला मराठीच्या मुद्द्यावरून मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली. दुकानदाराने व्हॉट्सॲपवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवले होते. मनसेचे पदाधिकारी विश्वजीत ढोलम यांनी दुकानदाराला माफी मागायला लावली आणि त्याची धिंड काढली.