दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी ७५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आणि त्यांच्या खलनायकाच्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवले. त्यांच्या निधनानंतर अनेक कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण केली. २०१५ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ते राजकारणातही सक्रीय होते.