Navpancham Rajyog 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनीला सर्वांत कठोर ग्रह मानले जाते. कारण- तो माणसांना त्यांच्या कर्मांनुसार फळ देतो. शनी हा फार हळू चालणारा ग्रह आहे, जो एका राशीत सुमारे अडीच वर्षे थांबतो.
सध्या शनी गुरूच्या मीन राशीत आहे आणि तिथे तो २०२७ सालापर्यंत राहणार आहे. त्यामुळे शनीचा कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संयोग होण्याची शक्यता आहे. याचदरम्यान जुलै महिन्याच्या शेवटी शनी कर्क राशीत असलेल्या सूर्याशी संयोग करून नवपंचम राजयोग तयार करणार आहे.