महाराष्ट्रात हिंदी-मराठी भाषा वाद चर्चेत आहे. मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी मराठीच असावी, अशी भूमिका घेतली आहे. दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांनी विविध भाषांचे सौंदर्य आणि आदानप्रदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले. मात्र, हिंदी सक्तीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. भाषावाद हा राजकीय मुद्दा नसून, मराठी लोकांसाठी भावनिक आहे. मराठी सिनेमांना हिंदी सिनेमांशी टक्कर द्यावी लागत असल्याचेही त्यांनी नमूद केले.