भारत-बांगलादेश यांच्यातील सध्या तणावपूर्ण असलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर भारताने ढाक्याला मदतीचा हात पुढे केला आहे. जगद् विख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांचे बांगलादेशातील मूळ जुने घर पाडून तिथे नवी इमारत बांधण्याचा निर्णय बांगलादेश सरकारने घेतला होता. तर या वास्तूच्या जतनासाठीचा संपूर्ण खर्च करण्याची तयारी भारताने दर्शविली आहे. वाढत्या दबावामुळे बांगलादेश प्रशासनाने मयमनसिंह येथे सुरू असलेलं सत्यजित रे यांच्या वडिलोपार्जित घराचे पाडकाम तत्काळ थांबवलं आहे.