उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद महाराष्ट्राला माहीत आहे. २०२२ मध्ये शिंदेंनी ४० आमदारांसह बंड केल्याने महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. १६ जुलैला विधान परिषदेत दोघे समोरासमोर आले. उद्धव ठाकरेंनी फडणवीस आणि अजित पवारांशी हस्तांदोलन केलं, पण शिंदेंकडे दुर्लक्ष केलं. दोघे एकाच फ्रेममध्ये दिसल्याने राजकीय चर्चेला उधाण आलं.