इराकच्या अल कुट शहरातील एका शॉपिंग मॉलला लागलेल्या आगीत ६० जणांचा मृत्यू झाला आहे, तर ११ जण बेपत्ता आहेत. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पाच मजली मॉलला लागलेल्या आगीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मॉलच्या मालकाविरोधात आणि अग्नि सुरक्षा यंत्रणांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे. वासित प्रांत प्रशासनाने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.