एखादी भाषा ही फक्त संवादाचे साधन नसते, तर तिच्या माध्यमातून त्या भाषेशी संबंधित संस्कृतीही जपली जाते. मराठी आणि हिंदी किंवा कन्नड आणि हिंदी असा वाद आज जोर धरू लागलाय; परंतु, ५४ वर्षांपूर्वी मातृभाषा नाकारल्यामुळे पाकिस्तानची फाळणी झाली होती. त्यानंतर जगाच्या इतिहासात ‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन’ साजरा करण्यास सुरुवात झाली.