भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांत विधिमंडळात हाणामारी झाली. मागील दोन दिवसांपासून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू होती. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मराठी अभिनेता सुव्रत जोशीने या घटनेवर टीका करत इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली. सुव्रत सध्या ‘वरवरचे वधू वर’ या नाटकात सखी गोखलेसोबत काम करत आहे.