रशियन महिला नीना कुटीना रामतीर्थ डोंगराजवळच्या जंगलात दोन मुलींसह एका गुहेत सापडली. ध्यानधारणा आणि अध्यात्मासाठी ती तिथे राहत होती. तिच्या मुलींचे वडील इस्रायली व्यावसायिक असल्याचे समोर आले. नीना आणि तिच्या मुली निसर्गाच्या सान्निध्यात आनंदी होत्या. मुलींच्या वडिलांनी त्यांना रशियात परत पाठवण्यासाठी खर्च करावा असं आवाहन त्यांना एफआरपीओने केलं आहे.