scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

अहमदनगर News

अहमदनगर जिल्हा महाराष्ट्राच्या पश्चिम भागात आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्हा (Ahmednagar District)ओळखला जातो. अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेस नाशिक व औरंगाबाद, पूर्वेस बीड, दक्षिणेस सोलापूर व उस्मानाबाद आणि पश्चिमेस पुणे व ठाणे हे जिल्हे आहेत. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात प्रामुख्याने अकोले व संगमनेर तालुक्यांमध्ये सह्याद्रीच्या डोंगररांगा पसरलेल्या आहेत ज्या हरीश्चंद्राच्या डोंगररांगा म्हणून ओळखल्या जातात. महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई याच डोंगररांगांमध्ये अकोले तालुक्यात आहे. गोदावरी, भीमा, सीना, मुळा व प्रवरा या अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख नद्या असून आढळा, घोड, कुकडी या नद्या जिल्ह्यातून वाहतात. या जिल्ह्याच्या नावावरूनच पूर्वीच्या काळात या भागावर असलेल्या निजामशाही व मोगल साम्राज्याचे वर्चस्व लक्षात येते.
महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) पहिली मानवी वसाहत याच जिल्ह्यात प्रवरा व गोदावरी नद्यांच्या किनाऱ्यावर झाली, असा निष्कर्ष पुण्याच्या डेक्कन कॉलेजने नेवासातील उत्खननानंतर काढला आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने श्रीरामपूर (Srirampur) तालुक्यातील दायमाबाद येथे केलेल्या उत्खननातून या जिल्ह्यात सिंधु संस्कृतीचे अस्तित्व सिद्ध झालेले आहे.
Read More
ahilyanagar 11th admission seats vacant
अहिल्यानगर जिल्ह्यात अकरावी प्रवेशाच्या ४५ हजार जागा रिक्त !

यंदा जिल्ह्यातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ६१ हजार ४१२ होती. त्यातील काही तंत्रनिकेतन व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाकडेही विद्यार्थी वळले आहेत.

ahilyanagar 210 students exam for isro trip
अहिल्यानगर: इस्रोच्या सहलीसाठी २१० विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा !

डॉ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर थुंबा, केरळ (इस्रो) या ठिकाणी जाणाऱ्या सहलीसाठी जिल्हास्तरावरील निवड चाचणी परीक्षा रविवारी घेण्यात आली.

ahiyanagar akole Pravara River Flood Warning
अकोलेत पावसाचा जोर वाढल्याने प्रवराकाठी सतर्कतेचा इशारा…

भंडारदरा आणि निळवंडे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे प्रवरा नदीची पातळी पुन्हा वाढली आहे, त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला…

Nilesh Lanke Forms New Alliance in ahilyanagar
नगर महापालिका निवडणुकीसाठी ‘मविआ’ऐवजी शहर विकास आघाडी, खासदार नीलेश लंके यांचा पुढाकार; वरिष्ठांशी चर्चा…

शहर विकासातील अनुशेष भरून काढण्यासाठी महापालिकेची निवडणूक शहर विकास आघाडीमार्फत लढवण्याची चर्चा सुरू असल्याचे नीलेश लंके म्हणाले.

farmers loan waiver on mahayuti agenda says eknath shinde
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय महायुतीच्या अजेंड्यावर : उपमुख्यमंत्री शिंदे

शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.