scorecardresearch

अजित आगरकर News

अजित भालचंद्र आगरकर (Ajit Agarkar)हे भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक आहेत. ते ४ जुलै २०२३ पासून ते बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० या तिन्हीही फॉरमॅटमध्ये २०० पेक्षा जास्त अधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.१९९९, २००३ आणि २००७ विश्वचषक स्पर्धेसाठी पाठवण्यात आलेल्या भारतीय संघामध्ये त्यांचा समावेश होता. २००७ मध्ये झालेल्या पहिल्या टी-२० विश्वचषकाच्या संघामध्येही अजित आगरकर होते.


अजित आगरकर यांचा जन्म ४ डिसेंबर १९७६ रोजी मुंबईत झाला. फार लहानपणी त्यांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. ते रमाकांत आचरेकर यांच्याकडे क्रिकेटचे धडे गिरवत होते. आचरेकर सरांच्या सांगण्यावरुन अजित आगरकर यांना राजा शिवाजी विद्यालयातून शारदाश्रम विद्यामंदिर या शाळेत प्रवेश घेतला. शाळेमध्ये असताना अजित शिवाजी पार्क मैदानामध्ये सराव करत असत. याच काळात थोडी फार गोलंदाजी करु शकणार फलंदाज म्हणून ते विकसित झाले. पुढे वयवर्ष १५ असताना त्यांना अंडर-१६ आंतर शालेय क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळायची संघी मिळाली. तेव्ह त्यांनी तिहेरी शतक झळकावले. मुंबईच्या संघामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ते प्रयत्न करत होते. पण तेव्हा संघात एका गोलंदाजाची गरज होती. त्यामुळे अजित आगरकर यांनी गोलंदाजीवर लक्ष केंद्रित केले. शालेय स्तरावरील शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी रुपारेल महाविद्यालयात प्रवेश घेतला. दरम्यानच्या काळामध्ये ते मुंबईच्या संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक बनले.


त्यांनी ७ ऑक्टोबर १९९८ रोजी अजित आगरकर यांनी पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला. त्याच वर्षी एप्रिल महिन्यामध्ये त्यांनी एकदिवसीय फॉरमॅटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर २००६ मध्ये दक्षिण आफ्रिका संघाच्या विरुद्ध टी-२० सामन्याच्या भारतीय संघात त्यांचा समावेश करण्यात आला. त्यांनी २६ आंतराराष्ट्रीय कसोटी सामने, १९१ एकदिवसीय सामने खेळले. या कसोटी फॉरमॅटमध्ये त्यांनी ५७१ धावा केल्या तर वनडे फॉरमॅटमध्ये १,२६९ धावा केल्या. एकूण आंतरराष्ट्रीय कारकीर्दीमध्ये त्यांनी कसोटी सामन्यात ५८ गडी बाद केले, तर एकदिवसीय सामन्यामध्ये २८८ गडी बाद केले. गोलंदाजी-फलंदाजीसह ते क्षेत्ररक्षणामध्येही तरबेज होते. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय विक्रम मोडले आहेत. एकदिवसीय फॉरमॅटमध्ये २१ चेंडूमध्ये सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम अजित आगरकर यांच्या नावावर आहे. शिवाय त्यांनी सर्वात कमी सामन्यांमध्ये २०० गडी बाद करण्याचा आणि १००० धावा करण्याचा विक्रमही केला आहे. १९९९-२००० मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना आगरकर यांनी आगळा-वेगळा विक्रम केला होता. या दौऱ्यामध्ये ते सलग पाच वेळा शून्यावर बाद झाले. या विक्रमामुळे त्यांना बॉम्बे डक हे नाव पडले.


Read More
virat kohli rohit sharma
IND vs AUS: “रोहित- विराट वनडे संघात कशाला?”, माजी खेळाडूचा निवडकर्त्यांना थेट सवाल

Dilip Vengasarkar On Team India Selection: भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघावर प्रश्नचिन्ह…

ajit agarkar
भविष्याच्या विचार करून गिलकडे कर्णधारपद दिल्याचे आगरकर यांचे स्पष्टीकरण

आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची शनिवारी घोषणा करण्यात आली. पाच सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी अपेक्षित संघनिवड करण्यात आली.

Ajit Agarkar Masterstroke for Indian Cricket Rohit Sharma & Virat Kohli Can Play But Future will Decide
अजित आगरकरांचा मास्टरस्ट्रोक! रोहित-विराट वनडे सामने खेळू शकणार, पण भविष्याचा निर्णय मात्र…

Rohit Virat ODI Future: ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे संघ जाहीर करताना चाहत्यांना मोठा धक्का दिला. रोहितला वनडेच्या कर्णधारपदावरून हटवत गिलकडे जबाबदारी सोपवली.

Why Rohit Sharma Removed as ODI Captain Ahead of IND vs AUS Series
Rohit Sharma: “त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी…” रोहितला वनडेच्या कर्णधापदावरून हटवण्याचा निर्णय का घेतला? आगरकरांचं मोठं वक्तव्य

Why Rohit Sharma Removed as ODI Captain: रोहित शर्माच्या जागी वनडे संघाचं कर्णधारपद आता शुबमन गिलला देण्यात आलं आहे. पण…

karun nair ajit agarkar
Team India: क्रिकेटने एक संधी दिली, पण Karun Nair ने वाया घालवली; अजित आगरकरांनी सांगितलं संघाबाहेर करण्याचं कारण

Ajit Agarkar On Karun Nair: भारत-वेस्टइंडिज कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघ जाहीर केला आहे. या संघातून करूण नायरला वगळण्यात आलं…

Ajit Agarkar Statement on Why are Shreyas Iyer & Yashasvi Jaiswal not picked in India Asia Cup squad
Asia Cup 2025: “कोणाच्या जागी त्याला संघात घ्यावं?”, श्रेयस अय्यरला आशिया कपसाठी संधी न मिळण्याबाबत अजित आगरकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

Ajit Agarkar On Shreyas Iyer YashasvI Jaiswal: भारताच्या आशिया चषक २०२५ संघात श्रेयस अय्यर आणि यशस्वी जैस्वाल यांची निवड झाली…

eyes on Shubman Gill and Shreyas Iyer
गिलबाबत संभ्रम कायम, आशिया चषकासाठी आज संघनिवड; श्रेयसबाबतच्या निर्णयाकडेही लक्ष

पुढील वर्षी भारत आणि श्रीलंकेत ट्वेन्टी-२० विश्वचषक होणार असून संघबांधणीच्या दृष्टीने आशिया चषक स्पर्धा निर्णायक ठरू शकेल.

rohit sharma
Rohit Sharma: टी-२०,कसोटीनंतर रोहित वनडे क्रिकेटलाही रामराम करणार? कर्णधारपदासाठी ‘ही’ २ नावं चर्चेत

Team India ODI Captaincy: रोहित शर्माने टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. दरम्यान तो वनडे क्रिकेटलाही रामराम करणार…

shreyas iyer
Shreyas Iyer: “त्याला स्थान देणं…”, अजित आगरकरांनी सांगितलं श्रेयस अय्यरला कसोटी संघातून वगळण्याचं कारण, म्हणाले..

Ajit Agarkar On Shreyas Iyer: मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी श्रेयस अय्यरला संघात स्थान न देण्यामागचं कारण सांगितलं आहे.

ajit agarkar virat kohli
विराट कोहलीच्या निवृत्तीबाबत निवड समितीने मौन सोडलं, अजित आगरकर म्हणाले…

Ajit Agarkar on Virat Kohli Retirement : विराट कोहली गेल्या काही वर्षांपासून कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावाला साजेशी कामगिरी करू शकलेला…

Ajit pawar on Vaishnavi Hagawane Death Case
Vaishnavi Hagawane Death Case : “कस्पटेंच्या मुलीबाबत दुःखद घटना घडली, यात माझा काय दोष?” वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी आरोपांवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Pune Vaishnavi Hagawane Case Latest Updates : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात माझा दुरान्वयेही संबंध नसून याप्रकरणी मी आज कस्पटे कुटुंबियांची…