Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

आशिष मिश्रा Videos

आशिष मिश्रा (Ashish Mishra) हे केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा यांचे पुत्र आहेत. २०२०-२१ च्या दरम्यान देशभरात शेतकरी आंदोलन सुरु होते. याच पार्श्वभूमीवर अजय मिश्रा यांच्या लखीमपूर खेरी या मतदारसंघामधील अनेक शेतकरी हे देखील आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. तेव्हा सप्टेंबर २०२१ मध्ये प्रदेशात अजय मिश्रा यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये आंदोलक सामील झाले आणि त्यांनी अजय यांच्यासह भारतीय जनता पक्षातील अनेक सभासद उपस्थित होते. त्यावेळी आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले. तेव्हा आंदोलकांना संबोधून अजय मिश्रा यांनी आंदोलकांना संबोधून ‘सुधरा नाहीतर तुम्हाला नीट सुधारु..


मला दोन मिनिट नाही लागणार तुम्हाला सरळ करायला’ असे वक्तव्य केले. त्यांचे हे वक्तव्य खूप जास्त चर्चेत आले. त्यानंतर त्या परिसरामध्ये आंदोलनाचा प्रभाव वाढत गेला. ३ ऑक्टोबर २०२१ रोजी शेतकरी आंदोलन सुरु होते. तेव्हा अजय मिश्रा यांचे सुपुत्र आशीष मिश्रा यांनी त्या ठिकाणी भरधाव गाडी चालवत नेली. तेव्हा त्यांनी शेतकरी आंदोलकांना अक्षरक्ष: चिरडले. या घटनेमध्ये चार शेतकरी आंदोलक आणि एका पत्रकाराचा मृत्यू झाला. शिवाय तेथे असलेले अनेक आंदोलक देखील जखमी झाले. त्याप्रकरणी पोलिस चौकशी होऊन आशिष मिश्रा यांना अटक देखील करण्यात आली.


पुढे आशिष एका वर्षासाठी तुरुंगात होते. त्यानंतर जानेवारी २०२३ मध्ये त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. खटला सुरु असल्याने न्यायालयाने खटला संपेपर्यंत एखाद्या आरोपीला तुरुंगात ठेवणं, योग्य नाही, असे आपल्या निर्णयात म्हटलं आणि न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.


Read More

ताज्या बातम्या