scorecardresearch

बॉलिवूड Photos

बॉलिवूड म्हणजेच हिंदी चित्रपटसृष्टी होय. बॉलिवूड ही भारतातील सर्वात मोठ्या चित्रपटसृष्टींपैकी एक आहे. १९१३ मध्ये दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा चित्रपट तयार करुन भारतीय चित्रपटसृष्टीची मूहुर्तमेढ रोवली. तेव्हा चित्रपटांमध्ये आवाजाची सुविधा उपलब्ध नसल्याने सर्वच चित्रपट हे मूकपट असत. पुढे चित्रपट निर्मितीमध्ये झालेल्या प्रगतीमुळे चित्रपटांमध्ये संवाद, गाणी अशा गोष्टी समाविष्ट होत गेल्या. आलम आरा हा पहिला भारतीय बोलपट १९३१ मध्ये प्रदर्शित करण्यात आला. बोलपटांच्या उदयाने विविध भाषांमध्ये चित्रपट तयार होऊ लागले. दरम्यानच्या काळात महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये चित्रपट निर्मिती व्यवसाय मोठा होत गेला. मराठीसह हिंदी चित्रपट मुंबईमध्ये तयार होऊ लागले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत गेली. हॉलिवूड ही अमेरिकेतील अशी जागा आहे, जेथे चित्रपट व्यवसायाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. हॉलिवूडकडून प्रेरणा घेत पश्चिम बंगालमध्ये टॉलिवूड (टॉलिगंज येथे चित्रपट निर्मिती होत असल्याने) हा शब्द प्रचलित झाला होता.. पुढे मुंबईमधील हिंदी चित्रपटसृष्टीचे हॉलिवूड, टॉलिवूड प्रमाणे नाव असावे असे या व्यवसायातील दिग्गजांना वाटले. त्यातून बॉम्बे (मुंबई) या शब्दावर बॉलिवूडची निर्मिती करण्यात आली. १९७०-७१ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीद्वारे हॉलिवूडपेक्षा जास्त चित्रपटांची निर्मिती केल्याने बॉलिवूडचा उल्लेख वाढत गेला. आज बॉलिवूडमध्ये दरवर्षांला असंख्य चित्रपट प्रदर्शित होत असतात. मुंबईतील या सिनेसृष्टीमुळे हजारो नागरिकांना रोजगार मिळतो. मुंबईसाठी बॉलिवूड खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे. Read More
9 Photos
रक्षाबंधन विशेष : बॉलीवूडमधील अशी भावंडं, ज्यांच्या नात्यांच्या कहाण्या पडद्यामागेच राहिल्या आजवर

Raksha badhan 2025 : बॉलीवूडमध्ये काही भावंडांची अशी नाती आहेत, जी फार कमी लोकांना ठाऊक आहेत. रक्षाबंधनाच्या निमित्ताने जाणून घ्या…

Highest-Paid South Indian Actresses Of 2025, Highest-Paid South Indian Actresses
9 Photos
साई पल्लवी ते रश्मिका मंदाना; २०२५ मध्ये चित्रपटाच्या मानधनातून कोणं कमावतेय सर्वाधिक पैसे?

Highest Paid South Indian Actresses Of 2025: विविध भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित होण्याचा फायदा या कलाकारांना होतोय. त्यांच्या सोशल मीडिया फॉलोअर्सची…

Top Movies on human and elephants bond Mahadevi elephant Kolhapur vantara
11 Photos
हत्ती आणि माणसातील भावनिक नात्याचे बंध उलगडणारे ८ चित्रपट

सध्या महाराष्ट्रासह सबंध देशामध्ये महादेवी हत्ती प्रकरण खूप चर्चेत आहे. जगभरातील अनेक चित्रपटांमध्ये इतर प्राण्यांसह हत्ती आणि माणसातील घट्ट नातंही…

Dhanashree Verma goes back to Dubai,Yuzvendra Chahal take on divorce
12 Photos
“…मी कृतज्ञ आहे”; युजवेंद्र चहलच्या मुलाखतीनंतर धनश्री वर्मा दुबईत, सोशल मीडियावर व्यक्त केली भावना, चाहते म्हणाले, “शांतपणे दिलेलं उत्तर…”

धनश्रीने तिच्या दुबई ट्रिपचे काही सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती वडापाव, पाणीपुरी खाताना दिसून येत आहे.

sonam bajwa
9 Photos
Photos: प्रसिद्ध अभिनेत्रीचं निळसर वन पीसमध्ये मोहक फोटोशूट

फुलांनी सजलेला निळसर वन पीस परिधान करून, सोनम बाजवाचा निसर्गाच्या सान्निध्यात खुलला साधेपणा, सुंदरता व सकारात्मकता यांचा मनमोहक मिलाफ.

Karishma Kotak. who is Karishma Kotak, wcl
10 Photos
Who Is Karishma Kotak : WCL च्या अँकरवर स्पर्धेच्या मालकाचा जडला जीव; थेट प्रक्षेपणादरम्यान केलं प्रपोज…

Karishma kotak, Harshit Tomar: सामन्यानंतर, WCL च्या मालकाने लाईव्ह टीव्हीवर अँकरला प्रपोज केले. त्यानंतर अँकर करिश्मा कोटकची खूप चर्चा होत…

Friendship Day Special, Bollywood’s popular BFFs
11 Photos
Friendship Day: ‘तेरे जैसा यार कहाँ…’; एकमेकांवर जीव टाकणाऱ्या सिनेकलाकारांच्या मैत्रीची गोष्ट!

अनेक चित्रपट कलाकारांच्या मैत्रीच्या कथा खूप प्रसिद्ध आहेत. पडद्यावर एकमेकांशी भांडणारे दोन कलाकार खऱ्या जीवनात मात्र चांगले मित्र होते.

Roshni Walia Son of Sardar 2 Actress story about mother
11 Photos
Son Of Sardaar 2 Actress Roshni Walia: “बाहेर जा, पार्टी कर, पण प्रोटेक्शन…”, २३ वर्षीय अभिनेत्रीला आईने दिला होता अजब सल्ला

Son Of Sardaar 2 Actress Roshni Walia: रोशनी वालियाने सांगितले की, तिच्या आईने तिला मुक्तपणे जीवन जगण्याचा सल्ला दिला होता.…

ताज्या बातम्या