scorecardresearch

दसरा मेळावा News

१९ जून १९६६ रोजी बाळासाहेब ठाकरे (Babasaheb Thackeray) यांनी त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांसह शिवसेना या नव्या पक्षाची स्थापना केली. खुद्द प्रबोधनकार ठाकरे यांनी हे नाव सुचवले होते. मुंबईमध्ये मराठी माणसाची होणारी गळचेपी रोखण्यासाठी बाळासाहेबांनी एक चळवळ सुरु केली. पुढे हीच चळवळ शिवसेना म्हणून नावारुपास आली.

पक्षनिर्मितीनंतर एखादी जाहीर सभा घेण्याचा मानस शिवसेनाप्रमुखांचा होता. तेव्हा दसऱ्याचा मुहूर्त साधत दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ) येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले. ३० ऑक्टोबर १९६६ रोजी पहिला दसरा मेळावा (Dasara Melava) भरला. त्यावर्षापासून दरवर्षी शिवसेनेतर्फे दसरा मेळाव्याचे आयोजन केले गेले. या निमित्ताने बाळासाहेब खास भाषण करत. त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी लोक महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यातून येत असतं. पक्ष स्थापनेपासून ते आत्तापर्यंत २००६ साली अतिपावसामुळे, २००९ व २०१४ मध्ये विधानसभा निवडणुक आचारसंहिता लागू असल्याने दसरा मेळावा रद्द करण्यात आला होता.

२०१२ मध्ये बाळासाहेब शेवटचे भाषण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात केले होते. करोना काळात दसरा मेळावा छोटेखानी स्वरुपात साजरा केला गेला. शिंदे गटाच्या बंडानंतर २०२२ मध्ये शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांनी तर बीकेसीमध्य़े एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याचे आयोजन केले होते.
Read More
Deputy Chief Minister Ajit Pawar statement Dussehra celebration
दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरुन निर्णय घ्यावा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

‘ प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते प्रगल्भ आहेत. ते निर्णय घ्यायला सक्षम आहेत. दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरुन त्यांनी निर्णय घ्यावा.’ -…

Raj and Uddhav Thackeray
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरेही येणार? सोशल मीडियावरील टिझरमधल्या ‘त्या’ वाक्याने वेधलं लक्ष

उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टिझर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये गर्जना ठाकरेंची असा उल्लेख असल्याने उत्सुकता वाढली आहे.

Raj Thackeray and Uddhav Thackeray
दसरा मेळाव्यात राज ठाकरे यांच्या उपस्थितीवर ठाकरे गटातच मतांतर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मतभेद विसरून एकत्र येत असताना संजय राऊत यांनी दसरा मेळावा…

mohan bhagwat
“देश अस्थिर करण्याचा प्रयत्न”, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे वक्तव्य

कार्यक्रमाला इस्रोचे माजी अध्यक्ष के. राधाकृष्णन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या वेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी देशातील वाढत्या…

What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार? उद्धव ठाकरेंचा दसरा मेळाव्यातला दावा काय?

उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणात अजित पवारांबाबत महत्त्वाचं भाष्य केलं. तसंच एकनाथ शिंदेंवर बोचरी टीका केली.

aaditya thackeray dasara melawa speech
Video: “ते चष्मा खाली करून बोलणारे…”, म्हणत आदित्य ठाकरेंनी केली ‘या’ मंत्र्यांची नक्कल; एकनाथ शिंदेंचीही करून दाखवली मिमिक्री!

आदित्य ठाकरे म्हणाले, “मी आज मुंबई महानगर पालिकेच्या आयुक्तांना सांगतोय की याद राखा जर तुम्ही या भ्रष्टाचाराच्या कागदांवर सही केली…

Uddhav Thackeray Dasara Melava 2024
Uddhav Thackeray : “मला दिल्लीकरांची पर्वा नाही, त्यांना गाडून भगवा फडकवणार”, दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचा भाजपाला इशारा

Uddhav Thackeray Dasara Melava 2024: दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी महायुतीसह भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला.