scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

धुळे Photos

धुळे (Dhule) जिल्हा उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख जिल्हा असून क्षेत्रफळ ८ हजार ६१ चौरस किमी आहे. या जिल्ह्यात धुळे, शिरपूर, साक्री आणि शिंदखेडा असे चार तालुके आहेत. धुळ्याच्या पूर्वेस जळगाव, पश्चिमेस नंदूरबार, तर दक्षिणेस नाशिक जिल्हा आहे. धुळे जिल्हा गुजरात आणि मध्यप्रदेशच्या सीमेलगत आहे. धुळ्यात मोठ्या प्रमाणात कोरडवाहू शेतील केली जाते. येथे कापूस, बाजरी, ज्वारी, भुईमूग, मका, सोयाबीन ही प्रमुख पिके घेतली जातात. धुळे जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा जिल्हा आहे. लळिंग किल्ला, बालाजी आणि महादेव पुरातन मंदिर शिरपूर येथे आहे. तसेच देवपूर येथील स्वामीनारायण मंदिरही प्रसिद्ध आहे. Read More