scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

भारतीय सैन्यदल Videos

देशाच्या सीमा आणि देशातील नागरिकांचे शत्रूपासून रक्षण करणे हे भारतीय लष्कराचे (Indian Army) प्रमुख कर्तव्य आहे. भूदल, नौदल आणि वायूदल या तीन सेनांचा समावेश भारतीय लष्करामध्ये होतो. १८९५ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रेसिडेन्सी सैन्याच्या बरोबरीने भारतीय सैन्याची स्थापना करण्यात आली, पुढे १९४७ मध्ये स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्याचे भारतीय लष्करामध्ये विलीनकऱण करण्यात आले. भारतीय लष्कराला फार मोठा इतिहास आहे. सैन्यातील प्रत्येक सैनिक देशासाठी, देशवासियांसाठी लढत आहे. डिसेंबर २०२१ मध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये लष्कराचे प्रमुख बिपीन रावत यांचे निधन झाले. त्यानंतर जनरल मनोज पांडे यांची नियुक्ती लष्करप्रमुखपदी करण्यात आली.

भारतीय लष्करामध्ये अनेक रेजमेंट्स आहेत. सेवा परमो धर्म: हे भारतीय सैन्याचे ब्रीदवाक्य आहे. जगामध्ये लष्कराच्या बाबतीमध्ये चीन हा देश पहिल्या क्रंमाकावर आहे. तर भारतीय लष्कर हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे लष्कर आहे. भारताकडे १.४ दशलक्षाहून अधिक सक्रिय सैन्य आहे.
Read More