scorecardresearch

भारतीय रेल्वे News

भारतामध्ये पहिली रेल्वे (Indian Railway) धावल्यानंतर काही वर्षांमध्ये ब्रिटीशांनी देशभरामध्ये त्यांच्या सोयीसाठी रेल्वेचे जाळे पसरले. मे १८३६ मध्ये भारतीय रेल्वेची स्थापना करण्यात आली असे म्हटले जाते. पुढे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९५१ मध्ये या विभागाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. तेव्हापासून रेल्वे मंत्रालय भारतीय रेल्वे विभागाची जबाबदारी सांभाळत आहे. रेल्वेच्या या जाळ्याची एकूण लांबी ६७,४१५ कि.मी. इतकी आहे. जगातील चौथी सर्वांत मोठ्या रेल्वेसेवा असलेल्या भारतीय रेल्वेची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे.

या विभागाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. अश्विनी वैष्णव हे भारताचे रेल्वे मंत्री आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ सादर करताना रेल्वे विभागाच्या भांडवली खर्चासाठी एकूण २.४० लाख कोटी रुपये राखून ठेवले असल्याचे सांगण्यात आले. तेरा लाखांपेक्षा जास्त कर्मचारी रेल्वे विभागामध्ये कार्यरत आहेत.
Read More
Darbhanga Express runs once a week through three states - Maharashtra, Uttar Pradesh, Bihar
पुण्यातील बिहारी आणि मिथिला समाजाच्या मागणीसाठी थेट दिल्लीत धडक… काय आहे मागणी?

नागरिकांना गावी जाण्यासाठी आठवड्यातून एकच दिवस पुणे ते दरभंगा एक्स्प्रेस धावत असून ती दैनंदिन करावी. नुकतेच मिथिला समाजाच्या शिष्टमंडळाने दिल्लीत…

Nanded Mumbai Vande Bharat Express
विस्तारित ‘वंदे भारत’चा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ; नांदेडहून गुरुवारपासून सहा दिवस धावणार…

जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस सेवेचा नांदेडपर्यंत विस्तार, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन शुभारंभ.

Passengers could not book tickets due to technical glitch in IRCTC app
रेल्वे प्रवाशांना दिवाळीतील तिकिटे काढता येईनात रेल वन, आयआरसीटीसी संकेतस्थळ, अॅपचा घोळ प्रवासी त्रस्त

इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)च्या संकेतस्थळामध्ये रविवारी सकाळी तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना तिकीट काढणे कठीण झाले.

Ganpati Special Train
Ganpati Special Train : भारतीय रेल्वेची मोठी घोषणा; गणेशोत्सवासाठी ३८० विशेष गाड्या धावणार

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने गणेशोत्सव २०२५ साठी तब्बल ३८० गणपती विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे.

Indian Railways Chain Pulling Rules
विनाकारण धावत्या ट्रेनची साखळी ओढाल तर तुरुंगात जाल; जाणून घ्या भारतीय रेल्वेचे नियम, दंड

Indian Railways Chain Pulling Rules : भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १४१ नुसार योग्य कारणाशिवाय साखळी ओढण्यास मनाई आहे. पण, नेमक्या…

asangaon Lokmanya tilak terminus LTT railway Police stations
रेल्वे स्थानकांतील सुरक्षेला येणार बळकटी; आसनगाव, एलटीटी नवीन रेल्वे पोलीस ठाण्याचे उद्घाटन

आसनगाव, लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) रेल्वे पोलीस ठाण्याचे १५ ऑगस्ट रोजी उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांतील सुरक्षेला बळकटी…

raksha khadse long distance train stops jalgaon
केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंचा पाठपुरावा… रावेर, बोदवड स्थानकांवर ‘या’ गाड्यांना थांबा

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पाठपुराव्यामुळे जळगावातील रावेर आणि बोदवड स्थानकांवर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळाला आहे, या गाड्यांच्या थांब्यांमुळे…

Underground and elevated works are in progress on the bullet train Mumbai ahmedabad route
बुलेट ट्रेनच्या डोंबिवली जवळील दिवा-कोपर खाडी मार्गातील कामाला गती

मुंबई-अहमदाबाद या ५०८ किलोमीटर लांबीच्या मार्गावर धावणाऱ्या बुलेट ट्रेनच्या मार्गिकेतील भुयारी, उन्नत कामे प्रगतीपथावर आहेत. मुंबई हायस्पीड रेल्वे कार्पोरेशनने बुलेट…

ताज्या बातम्या