scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

कोकण रेल्वे News

उदरनिर्वाहासाठी कोकणामधील (Konkan) असंख्य लोक मुंबईकडे रवाना होऊन मिळेल ते काम करुन राहू लागले, त्यातील बहुसंख्य गिरण्यांमध्ये काम करत असतं. कोकणी माणसासाठी सण-उत्सव फार महत्त्वपूर्ण असतात. त्यासाठी गावाला जाण्यासाठी पूर्वी जहाजाचा प्रवास करावा लागे. पुढे एसटी आल्यानंतर चाकरमान्याचे कमी हाल होऊ लागले. पण हा प्रवास त्रासदायक असे. दरम्यानच्या काळात कोकणामध्ये जाण्यासाठी रेल्वे असावी असा विचार काहींच्या मनात आला. त्यात मुंबई व मंगळूर या दोन बंदरांदरम्यान थेट मार्ग नसल्यामुळे रेल्वे वाहतूक लांबच्या मार्गाने करावा लागे. उंचसखल भूभाग, अनेक नद्या, अतिवृष्टी या कारणांमुळे कोकणामध्ये रेल्वे विभाग उभारण्यास अडचणी येत होत्या. रेल्वे वाहतूक उपलब्ध नसल्यामुळे कोकणाचा विकास खुंटण्याची भिती लोकांमध्ये होती. जॉर्ज फर्नान्डिस यांच्या नेतृत्वाखाली कोकणी नेत्यांनी केंद्रामध्ये कोकण रेल्वे बांधण्याची मागणी केली. १९६६ साली दिवा-पनवेल रेल्वेचा मार्ग बांधला गेला व १९८६ मध्ये तो रोहापर्यंत वाढवला गेला.

१५ सप्टेंबर १९९० रोजी रोहा येथे कोकण रेल्वेचा (Konkan Railway) पायाभरणी समारंभ पार पडला. कोकण रेल्वेमार्गावरील पहिली रेल्वे २० मार्च १९९३ रोजी मंगळूर ते उडुपी दरम्यान धावली. १९९८ मध्ये कोकण रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले आणि १९ जुलै १९९९ रोजी सर्वप्रथम सर्वसामान्य नागरिकांना कोकण रेल्वेचा लाभ घेता आला.
Read More
CSMT platform expansion, Mumbai railway updates, Konkan Tejas Express changes, Jan Shatabdi Express rerouting,
परतीचा प्रवास करताना कोकणवासीयांचे होणार हाल; जनशताब्दी, तेजस एक्स्प्रेस दादरपर्यंतच धावणार

मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील (सीएसएमटी) फलाट क्रमांक १२ आणि १३ च्या विस्तारीकरणाचे काम सुरू असून या कामामुळे कोकणातून…

Konkan Railway speed limit, Konkan Railway monsoon timetable, Konkan Railway October schedule,
ऑक्टोबरपासून कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात बदल, पावसाळी वेळापत्रक रद्द होणार

पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळण्याचा धोका सर्वाधिक असतो. त्यामुळे रेल्वे मार्ग खोळंबतो. तसेच मोठा रेल्वे अपघात होण्याची शक्यता असते.

Konkan Railway
कोकणवासीयांचे विघ्न संपता संपेना, कोकण रेल्वेच्या नियोजनाचा बट्ट्याबोळ; गाड्या चार-पाच तास उशिरा, प्रवाशांचे हाल

Konkan Railway Updates : कोकण रेल्वेच्या नियोजनाचा बट्ट्याबोळ झाला असून गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

Mumbai to Sawantwadi Road Nagpur special train
मुंबई ते सावंतवाडी रोड, नागपूर विशेष रेल्वेगाडी

गाडी क्रमांक ०११०१ विशेष रेल्वेगाडी २६ ऑगस्ट रोजी रात्री १२.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून निघेल आणि त्याच दिवशी दुपारी…

he countrys first Ro Ro car service was operated on Konkan Railway
देशातील पहिली रो-रो कार सेवा धावली; भारतीय रेल्वेच्या इतिहासात कोकण रेल्वेचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले

रायगडमधील कोलाड ते गोव्यातील वेर्णा दरम्यान रो-रो कार सेवा सुरू करण्यात आली. शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास कोलाड येथून रो-रो…

Ro-Ro car service will run even if there are fewer reservations; Today is the deadline to reserve Ro-Ro car service
कितीही कमी आरक्षण झाले तरी रो-रो कार सेवा धावणार; रो-रो कार सेवा आरक्षित करण्याची आज अंतिम मुदत

कोकणातील प्रवास खड्डेमुक्त होण्यासाठी, रेल्वेगाडीच्या आरक्षणासाठी करावी लागणाऱ्या धावपळीतून सुटका करण्यासाठी, इंधन खर्चात बचतीसह पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी रो-रो कार सेवा…

Leopard killed after train hits Konkan Railway near Kanakavali Wildlife accident in Maharashtra
सिंधुदुर्ग:​ कोकण रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा कणकवली जवळ मृत्यू

कोकण रेल्वे मार्गावरील कणकवली तालुक्यातील कसाल-कार्लेवाडी येथे बुधवारी पहाटेच्या सुमारास एका मालगाडीच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झाला.

cm devendra Fadnavis claims extra train services for Ganesh devotees this year
गणेशभक्तांसाठी यंदा रेल्वेच्या ३६७ जादा फेऱ्या; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

आगामी गणेशोत्सवाच्या नियोजनाच्या अनुषंगाने राज्य शासनाने केंद्रीय रेल्वे मंत्री आणि भारतीय रेल्वेला गणेशभक्तांच्या सुविधेसाठी जादा गाड्या सोडण्याची मागणी केली होती.

ताज्या बातम्या