माधुरी दीक्षित Videos
 धकधक गर्ल म्हणून ओळख मिळवलेल्या व बॉलीवूडमधल्या यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत माधुरी दीक्षितचं नाव अव्वल स्थानावर येते. आपल्या सौंदर्याने आणि नृत्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या माधुरी दीक्षितने एका दशकापेक्षा जास्त काळ रसिकांच्या मनावर राज्य केले. माधुरीने ‘अबोध या हिंदी चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. ‘तेजाब’ चित्रपटात व त्यातही एक दोन तीन.. या गाण्यानंतर तिला खरी प्रसिद्धी मिळाली. अमेरिकेास्थित श्रीराम नेने यांच्याशी लग्न केल्यावर माधुरी बराच काळ ग्लॅमर विश्वाबाहेर होती. परंतु आता ती पुन्हा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये अभिनय करताना दिसते.Read More 
   
   
   
   
   
   
   
   
  