scorecardresearch

महाराष्ट्र पोलिस News

महाराष्ट्र पोलीस दल हे महाराष्ट्र राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम करते. राज्याच्या गृह मंत्रायलामध्ये महाराष्ट्र पोलीस दलाचा समावेश होतो. ‘‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’’ हे महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य आहे. हे देशातील सर्वात मोठ्या पोलीस दलांपैकी एक आहे. यामध्ये एकूण १२ पोलीस आयुक्तालये आणि २३ जिल्हा पोलीस घटक आहेत. यामध्ये पिंपरी चिंचवड आणि वसई विरार या दोन आयुक्तालयांचादेखील समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये २ लाखांपर्यंतचे मनुष्यबळ आहे. मुंबईमध्ये या दलाचे मुख्यालय आहे. पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची निवड संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत केली जाते. शिपाई तसेच अन्य पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया ठराविक कालावधीनंतर राबवण्यात येते. या संबंधित माहिती पोलीस दलाद्वारे प्रसिद्ध केली जाते. रजनीश सेठ हे महाराष्ट्र पोलीस दलाचे महासंचालक आहेत. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये अनेक विभाग आहेत. मुंबईवर पोर्तुगीजांचे राज्य असताना पहिल्यांदा पोलीस दलाची स्थापना करण्यात आली. पुढे या ब्रिटीश राज्यकर्त्यांनी पोलीस दलामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली. तेव्हा बॉम्बे प्रांतासाठी बॉम्बे पोलीस दल कार्यरत होते. पुढे १९४७ नंतर बॉम्बे प्रांताचे विभाजन होत राज्यांची निर्मिती होत गेली. तेव्हा बॉम्बे पोलीस दल महाराष्ट्र पोलीस, गुजरात पोलीस आणि म्हैसूर पोलीस (कर्नाटक पोलीस) या तीन दलांमध्ये विभागले गेले. महाराष्ट्र पोलीस खात्यामधील मुंबई पोलीस दल हे स्कॉटलंड यार्डनंतर जगातील सर्वोत्तम पोलीस दलांपैकी एक आहे असे मानले जाते. Read More
Ravi Ranas warning about the threat
“…तर घरात घुसून मारू,” रवी राणांचा इशारा; नवनीत राणांना येणाऱ्या धमकीवरून…

राज्यातील महिलांना धमकी आल्यास पोलीस आणि कायदा सुव्यवस्था बाजूला ठेवून आरोपींना युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते घरात घुसून मारल्याशिवाय सोडणार नाही.…

Two married women murdered by their husbands on the same day
धक्कादायक! एकाच दिवशी दोन विवाहितांची पतींकडून हत्या; वादातून एकीला कुऱ्हाडीने तर दुसरीला चाकूने भोसकले

दिव्यांनी चंद्रशेखर ठक (२७) रा. सोनाई नगर, यवतमाळ आहे मृत विवहितेचे नाव आहे. तर चंद्रशेखर उर्फ चंदू नारायण ठक (३४)…

Traffic jam from Kalwa to Digha due to Narli Purnima
कळवा ते दिघा पर्यंत वाहतुक कोंडी; नारळी पौर्णिमेच्या वाहतुक बदलाचा परिणाम

कळवा खाडी पूल येथे दरवर्षी नारळी पौर्णिमा उत्सव साजरा केला जातो. ठाण्यातील विविध भागातून नागरिक या उत्सवासाठी खाडी पूल येथे…

Chandrapur Congress District President Subhash Dhote has alleged
चंद्रपूर जिल्ह्य़ात सुद्धा मतांची चोरी; ‘या’ काँग्रेस नेत्याच्या आरोपाने खळबळ…

वारंवार पाठपुरावा करून ज्या आय पी एड्रेस द्वारे बोगस मतदार नोंदणी करण्यात आली, अशा संशयित मतदान चोरी करणाऱ्यांचा शोध अजूनही…

pune to get five new police stations and 1000 additional personnel Devendra fadnavis announces ai cctv and police expansion
पुण्यात आणखी पाच पोलीस ठाणी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

पुणे पोलीस आयुक्तालयातील विविध विकासकामांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात झाले.

Karad youth booked for repeated harassment sexual assault and arson in Malakapur Agashinagar
महिलेवर अत्याचार करून दिली जिवे मारण्याची धमकी, दुचाकी, कपडेही पेटवले; संशयितावर गुन्हा दाखल

कराड शहर परिसरातील मोलमजुरी करणाऱ्या एका २९ वर्षीय महिलेस वारंवार त्रास देत तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

buldhana traffic police suspended for extorting money from Karnataka motorists harassment case
खंडणी प्रकरणी ५ पोलीस कर्मचारी निलंबित; पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांची कडक कारवाई

चिखली शहरात वाहतूक पोलिसांकडून परराज्यातील वाहनचालककडून जबरदस्तीने पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Nagpur police recover ₹19 lakh in digital arrest cyber fraud after Odisha arrest
डिजिटल अरेस्ट ड्रामा संपला; आरोपी सापडला

डिजिटल अरेस्टची भिती दाखवत नागपूरकर व्यापाऱ्याला २४ लाखांची ऑनलाईन फसवणूक केल्या प्रकरणात गुरुवारी नागपूर पोलिसांच्या सायबर शाखेला यश आले.

ताज्या बातम्या