Page 12 of महाराष्ट्रातील पावसाळा News

सातत्याने सुरू असलेल्या पावसात शहरात विविध आजारांनी डोके वर काढले असताना गतवर्षीच्या तुलनेत डेंग्यूचा प्रादुर्भाव मात्र यंदा कमी आहे.

शहरातील रस्ते अरूंद असून त्यावर वाहनांची संख्या वाढत आहे, त्यामुळे दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

नंदुरबार तालुक्यातील शेगवे गावात पूल नसल्याने नदीतील पाण्यातून स्मशानभूमीपर्यंत मृतदेह घेऊन जाण्याची कसरत नातेवाईकांना करावी लागली.

राज्यात पुन्हा एकदा मोसमी पाऊस सक्रिय झाला असून मुंबईसह कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला…

मुंबईत मध्यरात्रीपासून मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला…

गत दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील प्रामुख्याने मेहकर, लोणार तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

राज्यात सर्वांत कमी पेरण्या कोकण विभागात आणि सर्वाधिक पेरण्या पुणे विभागात झाल्या आहेत. कृषी विभागाच्या आकडेवारीवरून ही बाब स्पष्ट झाली…

पुनर्वसनासाठी निश्चित केलेल्या जागेवर तयार करण्यात आलेल्या कच्चा रस्त्याच्या कामामुळे जमिनीला भेगा पडून जमिनीचा भाग पुनर्वसन वसाहत रस्त्यावर कोसळला.

कोचाई-बोरमाळ ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पारसपाडा येथे स्मशानभूमीच्या अभावी एका ११० वर्षीय आदिवासी महिलेच्या पार्थिवावर भरपावसात अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ आली…

हतनूर धरणाचे दोन दरवाजे पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून २६४८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सुरू आहे.

पावसाळ्यात धोकादायक जागांवर पर्यटकांचे वाढते अपघात विचारात घेत स्थळांवर निर्बंध

आदिवासी नागरिकांचे प्रमाण जास्त असणाऱ्या शहापूर तालुक्यात सुमारे ३२७ गाव – पाड्यांमध्ये स्मशानभूमीच नसल्याची बाब उघडकीस आली आहे.