scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

मराठा आरक्षण News

सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा सामाजाला आरक्षण (Maratha Reservation) असावे यासाठी १९९७ मध्ये पहिले मराठा आंदोलन करण्यात आले. ही चळवळ सुरुवातीला स्थानिक पातळीवर सुरु होती.

२००८-०९ मध्ये शरद पवार, विलासराव देशमुख अशा नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. २०१४ पर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाने या आंदोलनाची बाजू घेतली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले व युवराज संभाजी राजे भोसले यांनी मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेतला. मराठा आरक्षणासाठी राज्याच्या सर्व विभागांत परिषदा घेतल्या गेल्या. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेले. तेव्हा त्यांनी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली. पुढे मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती देणारा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. २०१७-१८ मध्ये मराठा क्रांती मोर्चे निघायला सुरुवात झाली. राज्य सरकारने आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यावर त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने कोणत्याही राज्यात आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसावे, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत असे म्हटले.

मराठा आरक्षणाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात ॲड डॉ. जयश्री पाटील यांनी याचिका दाखल केली, तर हा खटला त्यांचे पती ॲड गुणरत्न सदावर्ते यांनी यशस्वीपणे लढला. ५ मे २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारचा आरक्षणाचा निर्णय रद्द केला आणि मराठा आरक्षण हे असंवैधानिक व अवैध ठरवले. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने एकमताने हा निर्णय दिला.
Read More
Marches will be taken out across the state on behalf of the OBC community Chhagan Bhujbal
OBC protest: मराठा, कुणबी वेगळेच, ओबीसीही काढणार सर्व जिल्ह्यांमध्ये मोर्चे; जरांगे यांच्या विरोधात छगन भुजबळ आक्रमक

मराठा आणि कुणबी एक नाही हे न्यायालयानेही अधोरेखित केले आहे. यामुळे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देता येणार नाही, असे…

Manoj Jarange On Doctors Medical examination
Manoj Jarange : “डॉक्टरांना निलंबित करा…”, वैद्यकीय तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांवर मनोज जरांगे संतापले

Manoj Jarange : तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांवर मनोज जरांगे चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं.

Mumbai protest response
सीएसटी, बृहन्मुंबई महापालिका चौकातील चित्र बदलले; वाचा, जरांगे यांच्या आवाहनाला आंदोलकांनी कसा प्रतिसाद दिला

उच्च न्यायालयाने दिलेले आदेशाच्या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी आंदोलकांना आझाद मैदान आणि पार्किंगसाठी दिलेली मैदाने सोडून अन्य ठिकाणी लावलेली वाहने काढून…

Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest Updates
राज्य सरकारकडून कायदेशीर सल्लामसलतच सुरू; मनोज जरांगेंना ठोस प्रस्ताव नाही

फडणवीस यांनी जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारी बैठक घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्यासह…

Mumbai Maratha Reservation news
मराठा आरक्षण लागू असल्याने ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात अडथळा

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी करीत बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे.

maratha Protesters at CSMT shouted slogans entered train cabin
मराठा आंदोलक रेल्वे रूळावर; मोटरमनच्या केबिनमध्ये शिरून, ‘एक मराठा, लाख मराठा’चे फलक झळकावले

सोमवारी दुपारी सीएसएमटी रेल्वे स्थानकात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. तसेच, आंदोलक रेल्वे रुळावर उतरले होते. काही आंदोलकांनी लोकलच्या…

Manoj Jarange Patil Azad Maidan
आझाद मैदानावर नव्याने मंडप; मराठा आरक्षण आंदोलकांची दीर्घकाळ ठिय्याची तयारी

Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest Updates आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडायची नाही, असा जरांगे यांचा निर्धार असल्यामुळे मंडप उभारणी करण्याचे…

Chief Minister Devendra Fadnavis information regarding the Maratha movement pune print news
Devendra Fadnavis: न्यायालयाच्या आदेशांचे पालन होईल; मराठा आंदोलनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

‘मराठा समाजाच्या आंदोलनासंदर्भात उच्च न्यायालयाने काही आदेश दिले आहेत. आंदोलनाला जिथे परवानगी होती, तेथे अटी-शर्तींचे उल्लंघन झाले असल्याचे सांगून न्यायालयाने…

loksatta editor girish kuber on maratha reservation protest
‘मराठा आंदोलनामुळे राज्य सरकारची सर्वत्र नाचक्की’, गिरीश कुबेर यांचे परखड विश्लेषण

Maratha Reservation Protest: “मराठा आंदोलकांना मुंबईबाहेर रोखणे ही राज्य सरकारची जबाबदारी होती. सर्व यंत्रणा हाताशी असूनही राज्य सरकार यात अपयशी…

Manoj Jarange Patil Azad Maidan Protest
न्यायालयाचे आदेश पाळा, मुंबईकरांना त्रास देऊ नका; गोंधळ करणाऱ्यांनी गावी निघून जावे; मनोज जरांगे यांचा आदेश

Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest Updates मराठा आंदोलनाबाबत अॅड. गुणरत्ने सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी…

Manoj Jarange
Manoj Jarange : “आमच्यात घुसून कोणीतरी षडयंत्र करतंय”, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप; न्यायालयाच्या निर्देशानंतर केलं ‘हे’ आवाहन

आंदोलकांपैकी कोणी रस्त्यावर थांबलं असेल तर तातडीने मैदानावर जाऊन थांबण्याचं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे.

ताज्या बातम्या