scorecardresearch

मराठा आरक्षण Videos

सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा सामाजाला आरक्षण (Maratha Reservation) असावे यासाठी १९९७ मध्ये पहिले मराठा आंदोलन करण्यात आले. ही चळवळ सुरुवातीला स्थानिक पातळीवर सुरु होती.

२००८-०९ मध्ये शरद पवार, विलासराव देशमुख अशा नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. २०१४ पर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाने या आंदोलनाची बाजू घेतली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले व युवराज संभाजी राजे भोसले यांनी मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेतला. मराठा आरक्षणासाठी राज्याच्या सर्व विभागांत परिषदा घेतल्या गेल्या. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेले. तेव्हा त्यांनी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली. पुढे मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती देणारा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. २०१७-१८ मध्ये मराठा क्रांती मोर्चे निघायला सुरुवात झाली. राज्य सरकारने आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यावर त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने कोणत्याही राज्यात आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसावे, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत असे म्हटले.

मराठा आरक्षणाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात ॲड डॉ. जयश्री पाटील यांनी याचिका दाखल केली, तर हा खटला त्यांचे पती ॲड गुणरत्न सदावर्ते यांनी यशस्वीपणे लढला. ५ मे २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारचा आरक्षणाचा निर्णय रद्द केला आणि मराठा आरक्षण हे असंवैधानिक व अवैध ठरवले. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने एकमताने हा निर्णय दिला.
Read More
gunaratna sadavarte criticized manoj jarange patil over maratha aarakshan
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange:जरांगेंच्या नादी लागू नका,जालन्यातून सदावर्तेंची जरांगेंवर टीका

मराठा समाजाने मागणी केल्यानुसार हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र ही प्रमाणपत्रं कायद्यासमोर टिकणार नाही. मराठा…

prakash ambedkar gave a reaction on maratha aarakshan and manoj jarange patil
Prakash Ambedkar: “जो आनंद मराठा समाज व्यक्त करतोय…”; प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

Prakash Ambedkar: मराठा समाजाला ‘ओबीसी’ प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांच्या उपोषणाची…

Radhakrishna Vikhe Patil has responded to Rohit Pawars allegations against the government over Maratha reservation
मराठा आरक्षणावरुन रोहित पवारांनी सरकारवर केलेल्या आरोपाला विखेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…

Radhakrishna Vikhepatil: मनोज जरांगे यांच्या सगळ्या मागण्या सरकारनं मान्य केल्या. त्यानंतर जरांगेंनी उपोषण सोडलं. मराठा आंदोलनाला यश मिळाल्यानंतर रोहित पवार…

Chief Minister Devendra Fadnavis reaction after Manoj Jarange ended his hunger strike
Devendra Fadnavis: “मराठा समाजासाठी…”; जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis : मनोज जरांगे यांनी पाच दिवस आंदोलन केल्यानंतर अखेर उपोषण सोडले आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया…

Amit Thackerays post is in the news after Manoj Jaranges criticism of Raj Thackeray
Amit Thackeray Post: जरांगेंच्या राज ठाकरेंवरील टीकेनंतर अमित ठाकरेंची पोस्ट चर्चेत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मराठा आंदोलनाबबात केलेल्या विधानानंतर मनोज जरांगेंनी त्यांच्यावर टीकास्त्र डागलं होतं. त्यानंतर आता मनसे नेते अमित…

Doctors took precautionary measures and saved the life of a Maratha protester
Maratha Protestor Fainted: डाॅक्टरांनी प्रसंगावधान राखत वाचवले मराठा आंदोलकाचे प्राण

बाॅम्बे रुग्णालयामध्ये कार्यरत असलेले डॉ. दिलीप निकम हे मराठा मोर्चामध्ये सेवा देत आहेत. दरम्यान अचानकपणे एक मोर्चेकरी बेशुद्ध झाल्याच कळताच…

Pune Muslim People Support Manoj Jarange
Pune Muslim People Support Jarange: मुस्लीम मावळा फाउंडेशननं मराठा आंदोलकांसाठी पाठवलं जेवण

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मागील तीन दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदान येथे मनोज जरांगे पाटील हे आंदोलनास बसले आहेत.त्या…

Manoj Jarange Patils appeal to Maratha protesters
Manoj Jarange Patil: आंदोलनाची दिशा शांततेत ठेवा, मनोज जरांगे पाटलांचं आवाहन

मनोज जरांगे पाटील यांचं शुक्रवार पासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. दरम्यान, पाणी, जेवण याची गैरसोय झाल्याने आंदोलकांनी संताप…

Deputy Chief Minister Ajit Pawars reaction to Manoj Jaranges protest
Ajit Pawar on Jarange Protest: चर्चेतून मार्ग निघेल, जरांगेंच्या आंदोलनावर अजित पवारांची प्रतिक्रिया

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनासाठी बसले आहेत. दरम्यान न्यायालयाकडून मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला…

ताज्या बातम्या