scorecardresearch

Page 1524 of मराठी बातम्या News

अनिश पाटील) कुणाल कामराविरोधातील राज्यभरात दाखल गुन्हे मुंबई पोलिसांना वर्ग नाशिक ग्रामीण, जळगाव, मनमाड येथील गुन्हे वर्ग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विडंबनात्मक गाणे सादर केल्याप्रकरणी राज्यभरात तक्रारी लोकसत्ता प्रतिनिधी मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणे सादर करणाऱ्या हास्य कलाकार कुणाल कामराविरोधातील तीन गुन्हे खार पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यात नाशिक ग्रामीण, जळगाव व नाशिक (नांदगाव) येथील प्रकरणांचा समावेश आहे. याप्रकरणी कामराविरोधात खार पोलीस ठाण्यात यापूर्वीच एक गुन्हा दाखल केला आहे. त्यात शिवसेनेकडून (शिंदे) मुरजी पटेल तक्रारदार आहेत. तीन गुन्हे वर्ग मनमाड येथील शिवसेना (शिंदे) शहर प्रमुख मयुर बोरसे यांच्या तक्रारीवरून मनमाड पोलिसांनीही कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल केला होता. तो गुन्हा खार पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यात कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांची बदनामी केल्याचा तसेच दोन राजकीय पक्षांमध्ये द्वेष निर्माण केल्याचा आरोप आहे. याशिवाय जळगावचे शिवसेना (शिंदे) शहर प्रमुख संजय दिगंबर भुजबळ यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. ते प्रकरणही मुंबई पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. नाशिक नांदगाव येथील हॉटेल व्यावसायिक सुनील शंकर जाधव यांच्या तक्रारीप्रकरणी दाखल गुन्हाही खार पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या तीन प्रकरणांसह शिवसेना नेते मुरजी पटेल यांच्या तक्रारीवरून खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या सर्व गुन्ह्यांचा तपास आता एकत्रित करण्यात येणार आहे. सर्व गुन्हे खार येथील कार्यक्रमातील कामराच्या विडंबनात्मक गाण्याबद्दल आहेत. ही घटना खार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे ते सर्व गुन्हे खार पोलिसांना वर्ग करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. मुंबईतील गुन्ह्याची माहिती शिवसेना नेते मुरजी पटेल यांनी याप्रकरणी तक्रार केली आहे. तक्रारीनुसार, २३ मार्च रोजी एका कार्यक्रमात असताना माझ्या मोबाइलवर आमच्या पक्षाच्या एका कार्यकर्त्याने पाठवलेली लिंक प्राप्त झाली. त्यात कुणाल कामराने कॉन्टीनेन्टल हाँटेल, रोड नं ०३, खार पश्चिम, मुंबई या ठिकाणी केलेल्या एका स्टॅण्डअप कॉमेडी शोच्या कार्यक्रमाची व्हिडीओ क्लिप प्रसारित केली होती. ती पाहिली असता त्यामध्ये कामरा स्टॅण्डअप कॉमेडी शोमध्ये शिवसेना व शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची बदनामी करीत होता. ठाणे जिल्ह्यातील एक नेते असा उल्लेख करून त्यांनी विडंबनात्मक गाणे गायले. त्यामुळे एकमेकांप्रतीच्या भावना कलुशित होऊन दोन राजकीय पक्षांमध्ये व्देष भावना उत्पन्न होत आहे, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असल्याचे माहिती असून त्यांच्या नैतिक आचरणावर निंदाजनक वक्तव्य करून त्यांची बदनामी केली. तसेच आमच्या पक्षाच्या व आमच्या प्रतिस्पर्धी राजकीय पक्षाच्या एकमेकांप्रतीच्या भावना कलुषित करून दोन राजकीय पक्षांमध्ये व्देष भावना उत्पन्न केल्या म्हणून माझी त्याच्या विरोधात कायदेशीर तक्रार आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.
भूखंड घेता का भूखंड… श्रीमंत मुंबई महापालिकेवर भूखंड विकण्याची वेळ का आली? किमती कमी करून तरी खरेदीदार मिळतील? फ्रीमियम स्टोरी

पालिकेकडे मालमत्ता कर आणि विकास नियोजन म्हणजेच पुनर्विकासातून मिळणारे उत्पन्न हे दोन महत्त्वाचे उत्पन्न स्रोत आहेत. येत्या काही वर्षांत दैनंदिन…

Five workers kidnapped from Alandi for farm work
शेतातील कामासाठी आळंदीमधून पाच कामगारांचे अपहरण; दिवसभर काम आणि रात्री ठेवले जात होते डांबून

शेतातील कामे करण्यासाठी पाच कामगारांचे अपहरण करून कर्जत तालुक्यातील दुरगाव येथे शेतातील खोलीत दहा दिवस डांबून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला…

municipal elections
महापालिका निवडणुका नकोत आणि स्थानिक लोकप्रतिनिधीही तर नकोतच नकोत…

गेली पाच वर्षे राज्यात महापालिकांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. तेथील ‘कारभार’ प्रशासकांमार्फत चालवला जात आहे. स्थानिक नेतृत्व मुळापासून उखडून टाकण्याचाच हा…

mycology expert dr pandurang bagam information
बुरशीच्या प्रेमात

कुतूहलातून निर्माण झालेला ध्यास आणि त्यातून होत गेलेला अभ्यास यामुळे याच क्षेत्रात करिअरची वाट शोधलेल्या मायकोलॉजिस्ट डॉ. पांडुरंग बागम याचा…

Water problems in Mantralaya building news in marathi
मंत्रालयात पाणीबाणी; तीन दिवसांपासून ठणठणाट;  जाणून घ्या, नेमकं काय झालं, अधिकाऱ्यांचे एकमेकांकडे बोट फ्रीमियम स्टोरी

अपुऱ्या आणि कमी दाबाच्या पाणीपुरवठ्यामुळे मंत्रालयाला टँकरच्या पाण्यावर तहान भागविण्याची वेळ आली आहे.

article on parliament decorum violations in marathi
उलटा चष्मा : अशोभनीय वर्तन!

सभागृहाचे सदस्य हे सार्वजनिक जीवनात वावरणारे म्हणून ओळखले जातात. त्यामुळे केवळ सभागृहच नाही तर बाहेरही त्यांचे वर्तन सभागृहाच्या नियमानुसारच असायला…

spiritual significance of kumbh
लोक-लौकिक : मडकं, कुंभ आणि…! प्रीमियम स्टोरी

विधींचे अर्थ माहीत नसतात बहुतेकांना. त्यामुळे ‘धर्मात आहे हे सारं ,’ असं म्हणत सगळेच मागील पानावरून पुढे जातात.

Maharashtra budget session 2025,
‘अधिवेशन वाया गेले…’ ते का? प्रीमियम स्टोरी

जवळपास तीनचतुर्थांश असे प्रचंड बहुमत असतानाही महायुतीचे सरकार अजूनही चाचपडत असल्याचेच नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनुभवास आले.

Jagdeep Dhankhar Vice President comment on judicial appointments
अन्वयार्थ :आंब्याच्या करंडीत… फ्रीमियम स्टोरी

‘‘राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगा’साठी सरकारने ऑगस्ट २०१४ मध्ये केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवला असला तरी त्याचे पुनरुज्जीवन व्हायला हवे,

LSG beat SRH by 5 Wickets Nicholas Pooran Mitchell Marsh 116 Runs Partnership Shardul Thakur 4 Wickets
SRH vs LSG: लखनौचा हैदराबादवर दणदणीत विजय, पूरन-मार्शच्या फलंदाजीने घेतला ‘त्या’ पराभवाचा बदला; शार्दुल ठाकूरची भेदक गोलंदाजी

SRH vs LSG: लखनौ सुपर जायंट्स संघाने उत्कृष्ट कामगिरीसाठी हैदराबादवर ५ विकेट्सने पराभव केला.

Indians not forced to remove turbans during deportation by US
Deportation by US : शीख स्थलांतरितांना पगडी काढायला लावली? अमेरिकेचे भारतीयांना वाईट वागणूक दिल्याच्या आरोपांवर स्पष्टीकरण

भारतीय निर्वासितांना परत पाठवताना वाईट वागणूक दिल्याच्या आरोपांवर अमेरिकेने उत्तर दिले आहे.

ताज्या बातम्या