scorecardresearch

मनसे News

९ मार्च २००६ रोजी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ (मनसे) (Maharashtra Navnirman Sena) या पक्षाची स्थापना झाली. राज ठाकरे हे पक्षाध्यक्ष आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाचे नेतृत्त्व उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले तेव्हा राज ठाकरे आणि त्यांना समर्थन करणारा शिवसेनेतील गट नाराज झाला. तेव्हा जानेवारी २००६ मध्ये राज यांनी शिवसेना पक्ष सोडला.


पुढे दोन महिन्यांनी मार्च २००६ मध्ये त्यांनी नव्या पक्षाची घोषणा केली. महाराष्ट्र राज्य, मराठी भाषा आणि महाराष्ट्रातील मराठी माणूस यांना वैभव प्राप्त करुन देणे हे या पक्षाचे प्रमुख ध्येय आहे. काही वर्षांपूर्वी या पक्षाने हिंदुत्त्वाची विचारसरणी स्वीकारली. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये या पक्षाचे १३ उमेदवार निवडून आले. त्यानंतर २०१२ च्या महानगरपालिका निवडणुकांमध्येही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने चांगली कामगिरी केली. तेव्हा नाशिक महानगरपालिकेमध्ये त्यांचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते. सुरुवातीच्या काळात हा पक्ष खूप चर्चेत होता. राज ठाकरे यांचे भाषण आणि नेतृत्त्व यांमुळे तरुण या पक्षामध्ये सहभाग घेत होते. अनेक वादग्रस्त प्रकरणांमध्येही या पक्षाचे नाव जोडले गेले होते. हळूहळू महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मनसेचा प्रभाव कमी होऊ लागला. पक्षाला निवडणुकांमध्ये अपयश मिळू लागले. बरेचसे नेते, प्रवक्ते पक्ष सोडून जाऊ लागले. २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेच्या केवळ एकाच उमेदवाराचा विजय झाला होता.


राज ठाकरे आपल्या विधानांवरून नेहमी चर्चेत असतात. त्यांनी मशिदीतील भोंग्यांवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे हा विषय तापला होता. विरोधीपक्षांवर टीका करण्यासह ते मित्रपक्षांवरदेखील टीका करायला मागेपुढे बघत नाहीत. २०२४ च्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. त्यांनी महायुतीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नारायण राणे आणि ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हसके यांच्यासाठी सभा घेतली होती.


Read More
MNS protested against the stance taken by Union Bank of India in Nagpur
यूनियन बँकेला मराठीचे वावडे! मराठीतील पोलीस एफ आय आर मान्य नाही, मनसेचे आंदोलन

भाषेपायी अशी संतापजनक अडवणूक नागपूरच्या बोपचे कुटुंबीयांची केली जात आहे. हे वर्तन यूनियन बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेकडून केले…

Raj Thackeray : राज ठाकरे म्हणतात, “मी न बोललेले शब्द माझ्या तोंडी घातले”, उद्धव ठाकरेंशी युतीच्या दाव्यांवर दिलं स्पष्टीकरण!

Raj-Uddhav Thackeray Alliance : राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाबरोबर युती करण्याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे,

Prakash Mahajan On Raj Thackeray
Prakash Mahajan : “तुम्ही प्रवक्त्याला एवढं तुच्छ समजता?”, मनसेचा बडा नेता राज ठाकरेंवर नाराज; बोलून दाखवली खंत; म्हणाले, “मला पक्षाने…”

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

Uddhav Thackeray On Raj Thackeray
Uddhav Thackeray : “आता राज ठाकरेही बरोबर आलेत”, उद्धव ठाकरेंचं मनसेच्या युतीबाबत मोठं विधान; मुलाखतीचा टीझर लॉन्च

ही मुलाखत १९ आणि २० जुलैला प्रसिद्ध होणार आहे. मात्र, त्याआधी या मुलाखतीचा टीझर लॉन्च करण्यात आला आहे.

mns leaders favor alliance while Raj Thackeray promises decision at the right time
राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्या अंतर्गत कारवाईची मागणी; महासंचालकांकडे लेखी तक्रार

पंकजकुमार मिश्रा, नित्यानंद शर्मा व आशिष राय या तीन वकिलांनी पत्र लिहून महासंचालकांकडे याबाबत कारवाईची मागणी केली

Raj Thackeray
Raj Thackeray : राज ठाकरेंच्या अडचणी वाढणार? ‘त्या’ विधानावरून पोलीस महासंचालकांकडे तक्रार, कारवाई करण्याची मागणी

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अलिकडेच मुंबईत केलेल्या एका जाहीर भाषणादरम्यान एका वक्तव्याबाबत आक्षेप घेण्यात आला आहे.

Raj Thackeray news in marathi
ठाकरे गटाशी युतीविषयी निर्णय होणार का ?…मनसेचे सोमवारपासून इगतपुरीत शिबीर

महापालिका निवडणुकीत कुणाशी हातमिळवणी करायची, यावर मुख्यत्वे शिबिरात मंथनाची चिन्हे आहेत. काही वर्षांपूर्वी पक्षाचे अलिबाग आणि नंतर पनवेल येथे शिबीर…

हे प्रेम टिकवायचे की नाही हे ठाकरे बंधूंनी ठरवायचे आहे : मनसे नेते बाळा नांदगावकर

सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय घेतला नसता तर, पुढचे काही घडलेच नसते. हिंदी सक्ती केली तर, मराठी माणूस उठून पेटणारचं होता.…

Video Kasheli Tunnel Avinash Jadhav
Video: “कोकणवासियांच्या जीवाशी खेळ का?” कशेळी बोगद्याची भीषण परिस्थिती; मनसे नेते अविनाश जाधव यांनी शेअर केला व्हिडिओ

Kasheli Tunnel Video: अविनाश जाधव यांनी नाशिकच्या इगतपुरी भागात प्रवास करताना तिथे असलेल्या बोगद्यांतील सुविधांची तुलना कोकणातील बोगद्यांशी करून, “हजारो…

ताज्या बातम्या