scorecardresearch

मनसे Videos

९ मार्च २००६ रोजी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ (मनसे) (Maharashtra Navnirman Sena) या पक्षाची स्थापना झाली. राज ठाकरे हे पक्षाध्यक्ष आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाचे नेतृत्त्व उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले तेव्हा राज ठाकरे आणि त्यांना समर्थन करणारा शिवसेनेतील गट नाराज झाला. तेव्हा जानेवारी २००६ मध्ये राज यांनी शिवसेना पक्ष सोडला.


पुढे दोन महिन्यांनी मार्च २००६ मध्ये त्यांनी नव्या पक्षाची घोषणा केली. महाराष्ट्र राज्य, मराठी भाषा आणि महाराष्ट्रातील मराठी माणूस यांना वैभव प्राप्त करुन देणे हे या पक्षाचे प्रमुख ध्येय आहे. काही वर्षांपूर्वी या पक्षाने हिंदुत्त्वाची विचारसरणी स्वीकारली. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये या पक्षाचे १३ उमेदवार निवडून आले. त्यानंतर २०१२ च्या महानगरपालिका निवडणुकांमध्येही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने चांगली कामगिरी केली. तेव्हा नाशिक महानगरपालिकेमध्ये त्यांचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते. सुरुवातीच्या काळात हा पक्ष खूप चर्चेत होता. राज ठाकरे यांचे भाषण आणि नेतृत्त्व यांमुळे तरुण या पक्षामध्ये सहभाग घेत होते. अनेक वादग्रस्त प्रकरणांमध्येही या पक्षाचे नाव जोडले गेले होते. हळूहळू महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मनसेचा प्रभाव कमी होऊ लागला. पक्षाला निवडणुकांमध्ये अपयश मिळू लागले. बरेचसे नेते, प्रवक्ते पक्ष सोडून जाऊ लागले. २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेच्या केवळ एकाच उमेदवाराचा विजय झाला होता.


राज ठाकरे आपल्या विधानांवरून नेहमी चर्चेत असतात. त्यांनी मशिदीतील भोंग्यांवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे हा विषय तापला होता. विरोधीपक्षांवर टीका करण्यासह ते मित्रपक्षांवरदेखील टीका करायला मागेपुढे बघत नाहीत. २०२४ च्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. त्यांनी महायुतीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नारायण राणे आणि ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हसके यांच्यासाठी सभा घेतली होती.


Read More
mulund-dumping-ground-ganesh-idols-avinash-jadhav-administration
Avinash Jadhav: अविनाश जाधव मुलुंडमधील डम्पिंग ग्राऊंडवर गेल्यावर काय घडलं?|PK3

ज्या गणरायाची मोठ्या भक्तिभावाने प्रतिष्ठापना केली जाते,त्याच गणरायाच्या मूर्ती भंगलेल्या आणि अत्यवस्थ अवस्थेत मुलुंड येथील डम्पिंग ग्राऊंड परिसरात दिसून आल्याने…

Anchored the event in Gujarati bhasha what happened after the MNS supporters raised objections
गुजरातीत सूत्रसंचालन केलं; मनसेच्या आक्षेपानंतर काय घडलं? | PS3

रिक्षा, टॅक्सी चालकांच्या मराठी सक्तीचा वाद सुरू आहे. अशातच मिरा-भाईंदरमधील पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्रमात गुजरातीमध्ये सुत्रसंचालन केल्यावरून वाद निर्माण झाला. यावर…

zepto-mulund-warehouse-cockroach-eggs-tray-mns-protest
अंड्याच्या ट्रेमध्ये झुरळ अन्..; मनसैनिक झेप्टोच्या गोदामात जाताच काय घडलं?|PK3

भाजीपाला, फळे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची डिलिव्हरी करणाऱ्या झेप्टोच्या मुलुंडमधील गोदामातील अंड्यांच्या ट्रेमध्ये झुरळ आढळल्याचा आरोप मनसैनिकांनी केला आहे. मुलुंडमध्ये…

Bhavesh Kavre apologized after meeting Amit Thackeray
Amit Thackeray & Bhavesh Kavre: अमित ठाकरेंच्या भेटीनंतर भावेश कावरेनं मागितली माफी | PS3

मुंबईमधील ताडदेव परिसरातील एका इमारतीमध्ये विक्रीसाठी असलेल्या फ्लॅटची जाहिरात करताना एका प्रॉपर्टी एजंटने केलेल्या वक्तव्यावरून मोठा वाद पेटला होता. ‘मांसाहार…

Garbage drain in Kalyan MNS supporters make protest
Mns Kalyan: कल्याणामधील नाल्यात कचऱ्याचं साम्राज्य; मनसैनिकांनी थेट..|PK2

Mns Kalyan: कल्याण पश्चिमेतील मल्हार नगर आणि जोशी बाग परिसरातील नाले कचरा आणि गाळाने तुंबल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा…

MNS leader Avinash Jadhav has made serious allegations against Gunaratna Sadavarte in the ST Bank case
Avinash Jadhav:”सदावर्तेंनी एसटी बँकेत २०० कोटींचा भ्रष्टाचार…”; अविनाश जाधव काय म्हणाले?|PK2

Avinash Jadhav: मनसे नेते अविनाश जाधव यांनी ST बँक प्रकरणावरून गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ST बँकेच्या ११…

MNS anger over Marathi language controversy in Kandivali
MNS Marathi Viral Video।मराठी सक्तीचा वाद ! इंस्टाग्रामवरून थेट कॉलेजमध्ये, नेमकं काय घडलं?।AK2

कांदिवली येथील एका कॉलेजमध्ये एका मराठी विद्यार्थिनीने रिक्षाचालकांसाठी असलेल्या ‘मराठी सक्ती’च्या सरकारी नियमाबद्दल इन्स्टाग्राम स्टोरी टाकली होती. याचा राग धरून…

Avinash Jadhavs warning to the government on the issue of Thane Municipal Corporation recruitment process
Avinash Jadhav: ठाणे महानगरपालिकेच्या भरती प्रक्रियेचा मुद्दा; अविनाश जाधवांचा सरकारला इशारा

Avinash Jadhav: ठाणे महानगरपालिकेने सुमारे आठ-नऊ महिन्यांपूर्वी विविध पदांसाठी भरती जाहीर केली होती. या भरती प्रक्रियेसाठी लाखो तरुणांनी अर्ज केले…

woman approached MNS for help after a company in Ghatkopar delayed paying her salary
Mns Ghatkopar: कंपनीने महिलेचा पगार थकवला; मनसैनिकांचा आंदोलन केलं

Mns Ghatkopar: घटकोपरमधील एका कंपनीने पगार थकवल्याने महिलेने मनसैनिकांकडे मदतीसाठी धाव घेतली. त्यानंतर मनसैनिकांनी त्या कंपनीमध्ये जाऊन आंदोलन केले. मनसैनिकांनी…

ताज्या बातम्या