scorecardresearch

नागपूर न्यूज News

लोकसत्ताच्या या सदरामध्ये नागपूर शहरातील सर्व बातम्या (Nagpur News) वाचता येतील. नागपूर हे महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखले जाते. हे राज्यातील तिसरे मोठे शहर आहे. महाराष्ट्राच्या विदर्भातील सर्वात मोठे शहर नागपूर आहे. नागपूर हे भारताचे टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणूनही ओळखले जाते. तसेच नागपूर हे शहर संत्र्यांसाठी ओळखले जाते. नागपुराच्या आसपास संत्र्याच्या मोठ्या बागा असून तेथे मोठ्या प्रमाणात संत्री पिकतात. त्यामुळे येथे संत्र्यांची मोठी बाजारपेठ आहे. नागपूर शहरात नाग नदी आहे, ज्यावरून शहराला नागपूर हे नाव पडले आहे. इ. स. १८६७ मध्ये नागपूरहून मुंबई शहरापर्यंत ग्रेट इंडियन पेनिन्सुला कंपनीने रेलमार्ग विकसित केला आणि पहिली आगगाडी १८६७ मध्येच नागपूरहून निघाली.


मराठी ही नागपुरातील सर्वांत जास्त बोलली जाणारी भाषा आहे. मराठीची वऱ्हाडी बोलीभाषा विदर्भातील इतर भागांप्रमाणे येथेदेखील बोलली जाते. नागपूर हे विदर्भातील महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र आहे. अलीकडील काही वर्षात नागपुरात गुंतवणूक वाढत असून येथील अर्थव्यवस्था विस्तारत आहे.


नागपूरमध्ये देशभरातून विद्यार्थी येथे शिक्षण घ्यायला येतात. नागपूरमध्ये महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ (रामटेक) व महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ असे तीन विद्यापीठ आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपुरात घेतले जाते. भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्य भागात असलेल्या या शहरातच भारताचा शून्य मैलाचा दगड आहे. नागपुरमधील स्थानिक समस्या, घडामोडी, राजकीय घडामोडींबाबत सर्व माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हे वाचू शकता.


Read More
nagpur child rape murder case death penalty review to be heard by cji led bench   hearing under article 32
‘कलम ३२’अंतर्गत मृत्युदंडास आव्हान शक्य; फाशीला स्थगिती देताना सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

चार वर्षांच्या बालिकेवर बलात्कार व खून केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या नागपूरच्या वसंत दुपारे या आरोपीला सुनावण्यात आलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने…

manoj jarange parinay fuke
Parinay Fuke : आज शिवाजी महाराज असते तर, जरांगेची जीभ छाटली असती… – भाजप आमदार परिणय फुके

भाजप नेते व विधान परिषद सदस्य परिणय फुके यांनी जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबद्दल वापरलेल्या भाषेचा समाचार घेतला.

Krishna Khopde, East Nagpur MLA, BJP Nagpur stronghold, Abhijit Wanjari Congress, Nagpur political rivalry,
काँग्रेस आमदार वंजारींच्या पावलांनी भाजपचे खोपडे अस्वस्थ? पूर्व नागपुरात नेमके काय घडले?

सलग चारवेळा विधानसभेची निवडणूक चढत्या मताधिक्याने जिंकणारे पूर्व नागपूरचे भाजपचे विद्यमान आमदार कृष्णा खोपडे हे केवळ त्यांच्या मतदारसंघात काँग्रेसचे विधान…

E20 ethanol petrol, Nitin Gadkari ethanol statement, ethanol petrol benefits, ethanol India,
Nitin Gadkari : इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होण्याच्या आरोपावर गडकरी थेट म्हणाले, “हा गैरसमज…”

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी स्पष्ट वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी पुन्हा एकदा वाहनांमध्ये पेट्रोल सोबत इथेनॉल वापरण्यावर महत्त्वाचे विधान केले आहे.

supreme court grants interim stay on stray dog relocation John Abraham welcomed the decision
John Abraham : अभिनेता जॉन अब्राहमची आधी सर्वोच्च न्यायालयाला विनंती; आता मानले आभार…

माणूस आणि श्वान यांचे शांततापूर्ण सहअस्तित्त्व असले पाहीजे आणि कुत्र्यांना रस्त्यावरुन हटवले जाऊ नये, असे सांगत पेटा इंडियाचे मानद संचालक…

sanket bawankule accused of fake voter registration in kamthi assembly constituency controversy Congress questions
मंत्री बावनकुळेंच्या मुलाने मतदार नोंदणीचे ‘फॉर्म’ किती भरले? काँग्रेसचा सवाल

कामठी विधानसभा मतदारसंघात संकेत बावनकुळे यांनी शेकडो बनावट मतदार तयार केल्याचा काँग्रेस नेत्यांचा आरोप आहे.

Nagpur police file FIR against ex-principal for demanding 5 crore extortion case
खळबळजनक! माजी उपप्राचार्यने मागितली ५ कोटींची खंडणी; तक्रारी बंद करण्यासाठी…

त्रास देत खंडणी मागण्याचे सत्र सुरू केल्याच्या आशयाची गंभीर तक्रार सतचिकित्सा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष गंगाधर नाकाडे यांनी कोतवाली पोलिसांत दाखल…

Vikas Amte, tribal health Nagpur, tobacco addiction tribal areas, oral cancer in tribal youth,
आदिवासी समुदायांमध्ये वाढतोय मुख कर्करोग, पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केली चिंता

नागपूर पोलीस आयुक्तालयातर्फे राबवण्यात येत असलेल्या ऑपरेशन थंडर अंतर्गत श्वेत पत्रिकेचे राष्ट्रीय अग्निशमन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात प्रकाशन करण्यात आले.

Ganesh idol immersion Nagpur, mobile immersion tanks, artificial immersion ponds, Nagpur Ganesh utsav arrangements,
गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी : विसर्जनाचा नवीन पर्याय मोबाईल विसर्जन तलाव

अनेक ज्येष्ठ नागरिकांना श्रीगणेशाचे विसर्जन करण्यासाठी दूर जाता येत नाही. त्यांच्या सोयीसाठी महापालिकेतर्फे मोबाईल विसर्जन तलावाची अर्थात फिरते विसर्जन कुंडाची…