scorecardresearch

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार News

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी १९९९ मध्ये केली होती. या पक्षाचा प्रभाव महाराष्ट्रात अधिक आहे. मात्र २०२३ मध्ये या पक्षाला घरघर लागली. अजित पवार यांनी मूळ राष्ट्रवादी सोडून आपला एक वेगळा गट तयार केला. महाराष्ट्रात शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीचेही दोन गट झाले. हे दोन्ही गट शरद पवार गट (Sharad Pawar NCP) आणि अजित पवार गट (Ajit Pawar NCP) या नावाने ओळखले जातात.


शिवसेनेतून फुटल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने जशी भाजपाची साथ स्वीकारली त्याच मार्गावर अजित पवार आपल्या समर्थकांसह गेले. या बंडखोरीचा शरद पवार गटाला मोठा फटका बसेल असे समजले जात होते. मात्र वयाच्या ८३ व्या वर्षीही शरद पवार यांनी पक्षाची धुरा सांभाळत पक्ष संघटना मजबूत करण्याचे प्रयत्न केले. समर्थकांना एकत्रित करून तरुणांना संधी देत गटाला उभारणी दिली.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार (Sharad Pawar) यांनी काँग्रेस, शिवसेनेसह महाराष्ट्रात भाजपाच्या महायुतीला पराभवाची धूळ चारली. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना आणि काँग्रेस यांच्या माविकास आघडीने ४८ पैकी ३० जागांवर विजय मिळवला. यात शरद पवार यांच्या गटाला ९ जागा मिळवण्यात यश आले. विशेष म्हणजे, शरद पवार गटाला १० पैकी ९ जागा जिंकण्यात यश आले. तर अजित पवार (Ajit pawar) गटाला चार जागा मिळाल्या होत्या, त्यांना केवळ एकच जागा जिंकता आली. शरद पवार गटात सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, अनिल देशमुख आणि इतर नेते कार्यरत आहेत. तुतारी हे शरद पवार गटाचे चिन्ह आहे.


Read More
jitendra awhad Sharad Pawar
Protest Against Election Commission : निवडणूक आयोग बरखास्त करा…मुंब्र्यात हजारो नागरिक रस्त्यावर

लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी, लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या मदतीने सत्ताधाऱ्यांनी मत चोरी केली होती, हे…

ncp urges girna dam water release for farmers
पिकांना जीवदान द्या… गिरणेचे आवर्तन सोडण्याची शरद पवार गटाची मागणी

जिल्ह्यातील शेतकरी पावसाअभावी चिंताग्रस्त असून, गिरणेचे आवर्तन लवकरच सोडावे अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

Jitendra Awhad
निवडणूक आयोगाविरोधात शरद पवार गटाचे आंदोलन; जितेंद्र आव्हाड म्हणाले, “भारताचं वाटोळं…”

Election Commission: या आंदोलनादरम्यान माध्यमांशी बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “निवडणूक आयोग चोर आहे, त्याचा आम्ही निषेध करत आहोत.…

Sharad Lad preparing to join the BJP
सांगली : शरद पवार गटाच्या आमदाराचे पुत्र भाजपच्या वाटेवर

लाड यांच्या भाजप  प्रवेशाबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी क्रांती कारखान्यावर जाउन  प्रत्यक्ष बोलणीही केली आहेत.

NCP leader Jayant Patil took the government to task
बेदाण्याच्या चोरट्या आयातीवर सरकार शांत – जयंत पाटील

आमदार पाटील यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून प्रतिक्रिया दिली आहे. त्यात ते म्हणाले की, हवामानाच्या लहरीपणामुळे यंदाच्या द्राक्ष हंगामात उत्पादनात मोठी…

NCP city presidents wallet stolen during Sharad Pawars Mandal Yatra in Nagpur
शरद पवारांच्या मंडल यात्रेत पाकिटमारांचा सुळसुळाट, राष्ट्रवादी शहराध्यक्षांचे पाकिट चोरीला

अनेक नेत्यांच्या खिशातून चोरांनी रोख रक्कम आणि पाकिटे लंपास केल्याची माहिती मिळत आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील मंडल यात्रा शनिवारी…

sharad pawar ncp State President Shashikant Shinde in Nagpur
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला गळती… प्रदेशाध्यक्ष शशीकांत शिंदे स्पष्टच म्हणाले…

प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे नागपुरात प्रसिद्धी माध्यमांशी बोलतांना म्हणाले, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक व राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत…

Sharad Pawar demand EC probe
मत चोरीवर मुख्यमंत्री फडणवीस का बोलतात? शरद पवार यांचा सवाल

नागपूर पत्रकार क्लब तर्फे शरद पवार यांच्याशी आज वार्तालाप आयोजित केला होता त्याप्रसंगी ते एका प्रश्नाच्या उत्तरात असे म्हणाले.