scorecardresearch

रेल्वे अपघात Videos

भारतामध्ये ब्रिटीशांच्या काळापासून रेल्वेचे जाळे पसरले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत सरकारने या विभागावर विशेष लक्ष दिले आणि भारतीय रेल्वेचा व्याप वाढत गेला. आता देशभरात रेल्वेचे जाळे पाहायला मिळते. बहुतांश लोक प्रवासासाठी रेल्वेचा पर्याय निवडतात. लांबचा प्रवास म्हटल्यावर अनेकांनी भारतीय रेल्वे आठवते. भारतीयांसाठी फायदेशीर ठरणाऱ्या रेल्वेमध्ये अपघात होताना देखील पाहायला मिळतात. १९०२ मध्ये पहिल्यांदा रेल्वे अपघात झाला होता.


पुढे १९०७ मध्ये लाहोरजवळ झालेला रेल्वे अपघात हा तेव्हाचा सर्वात भीषण अपघात मानला जातो. स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील सर्वात प्राणघातक रेल्वे अपघात म्हणजे. बिहार ट्रेन दुर्घटना (१९८१), खन्ना रेल्वे आपत्ती (१९८८), फिरोजबाद रेल्वे आपत्ती (१९९५), गैसल ट्रेन दुर्घटना (१९९९), रफीगंज दुर्घटना (२००२). जून २०२३ मध्ये घडलेली ओडिशा ट्रेन दुर्घटना देखील फार भीषण होती. यामध्ये अनेक प्रवाश्यांना आपला जीव गमवावा लागला. तेव्हा पुन्हा रेल्वे अपघात आणि प्रवाशांची सुरक्षा हा मुद्दा ऐरणीवर आला होता.


भारतामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वे अपघातांचे (Railway Accident)प्रमाण वाढत असल्याचे पाहायला मिळते. रेल्वे रुळावरुन घसरणे, दोन रेल्वेट्रेन्सची टक्कर, ड्रायव्हर आणि सिग्नलमन यांच्यामुळे झालेला गोंधळ, रोलिंग स्टॉकची यांत्रिक बिघाड, लेव्हल क्रॉसिंगचा गैरवापर अशी काही रेल्वे अपघात होण्याची कारणे आहेत असे मानले जाते. काही वेळेस हे अपघात मानवाच्या चुकांमुळे घडू शकतात तर काही वेळेस तांत्रिक गडबडीमुळे रेल्वे अपघात उद्भवतात. भारतीय रेल्वे प्रशासन हे अपघात टाळण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न करत असल्याचेही आपल्याला पाहायला मिळते.


Read More
Raj Thackeray presented the situation by recalling his own journey Mumbai Local Train Accident at mumbra station
मुंब्रा रेल्वे अपघात; दोषी कोण? राज ठाकरेंनी स्वतः केलेल्या प्रवासाची आठवण सांगत मांडली स्थिती

Raj Thackeray On Mumbra Thane Train Accident : रेल्वेमध्ये होणाऱ्या अपघातांना मुंबईत परप्रांतीयांचे येणारे लोंढे कारणीभूत असून, रेल्वेसाठी स्वतंत्र महामंडळ…

Injured passengers in Jalgaon Pushpak express train accident share their experience
“आम्ही रेल्वेमधून उतरलो अन्…”; जळगाव रेल्वे दुर्घटनेतील जखमी प्रवाशांनी सांगितला अनुभव| Jalgaon

“आम्ही रेल्वेमधून उतरलो अन्…”; जळगाव रेल्वे दुर्घटनेतील जखमी प्रवाशांनी सांगितला अनुभव| Jalgaon

dcm ajit pawar reaction on pushpak express accident
Ajit Pawar: पुष्पक एक्सप्रेस अपघात: उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “अत्यंत दुर्दैवी…”

Jalgaon Pushpak Train Accident Latest Updates : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ मोठा रेल्वे अपघात घडला आहे. बंगळुरू एक्सप्रेसने…

Kanchenjunga Express Accident A major train accident in West Bengal caused 5 casualties and 25 injured
Kanchenjunga Express Accident: पश्चिम बंगालमध्ये रेल्वेचा मोठा अपघात, पाच जणांचा मृत्यू, २५ जखमी.

पश्चिम बंगालमध्ये मालगाडीने कंचनजंगा एक्सप्रेसला धडक दिल्याने रेल्वेचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून २५…

ताज्या बातम्या