scorecardresearch

राज ठाकरे News

महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकीय पुढारी आहेत. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे (Uddhav Thackeray) चुलत भाऊ आहेत. राज ठाकरे यांचा जन्म १४ जून १९६८ रोजी मुंबईत झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्रीकांत ठाकरे आणि आईचे नाव कुंदा ठाकरे आहे. त्यांना २ मुले आहेत आणि त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे या मराठी चित्रपटसृष्टीतील छायाचित्रकार, निर्माता-दिग्दर्शक मोहन वाघ यांच्या कन्या आहेत. राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे हेदेखील आता राजकारणात सक्रिय झाले आहेत.


शिवसेनेत असताना भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून आणि जाहिर सभांमधून राज ठाकरेंनी आपल्या वक्तृत्व आणि नेतृत्व गुणांची चुणूक दाखवली. शिवसेनेत मतभेद झाल्यानंतर त्यांनी ९ मार्च २००६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पक्षाची स्थापना केली. मनसेची स्थापना होताच, परप्रांतियांचे राज्यात येणारे लोंढे, भूमिपुत्रांचे हक्क, मराठी भाषेला प्राधान्य, रेल्वेमध्ये होणारी उत्तर भारतीयांची नोकरभरती, मुंबईच्या समुद्रकिनारी होणारी छठपुजा या मुद्द्यांवरून जोरदार रणशिंग फुंकले.

मनसेने टोल विरोधात छेडलेले आंदोलनही लक्षवेधी ठरले. तसेच मशिदीवरील लाऊडस्पीकर आणि मुंबईत दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी मनसेने आक्रमक आंदोलन केले. राज ठाकरेंच्या आक्रमक आणि स्थानिक मुद्द्यांच्या राजकारणामुळे २००९ साली विधानसभा निवडणुकीत मनसेचे १३ आमदार निवडून आले होते. मात्र त्यानंतर पक्षाला गळती लागत २०१४ आणि २०१९ साली राज ठाकरेंना केवळ एक आमदार निवडून आणता आला.


राज ठाकरेंनी वेळोवळी घेतलेल्या राजकीय भूमिका अनेकदा वादात अडकल्या आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देत मनसेचे उमेदवार उभे केले, मात्र त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. २०१९ साली लोकसभा निवडणुकीदरम्यान ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत भाजपाच्या विरोधात त्यांनी जोरदार प्रचार केला. तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अधिकृतरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देत महायुतीचा घटक होणे पसंत केले. तसेच महाविकास आघाडीच्या विरोधात महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभाही घेतल्या.


Read More
Raj Thackeray Uddhav Thackeray
Uddhav Thackeray And Raj Thackeray: मनसेबरोबरच्या युतीची राहुल गांधींना कल्पना दिली का? “हा विषय…”, ठाकरे गटाची स्पष्ट आणि रोखठोक भूमिका

Uddhav Thackeray And MNS: राज ठाकरे यांच्या परप्रांतीयविरोधी भूमिकेमुळे काँग्रेसमधील काही नेत्यांचा त्यांना विरोध आहे.

raj Thackeray supports Bachchu Kadu
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानंतर बच्चू कडूंच्या आंदोलनाला बळ! प्रीमियम स्टोरी

बच्चू कडू यांच्या आंदोलनाला शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आधीच पाठिंबा जाहीर केला आहे. अनेक विरोधी पक्षातील नेते, शेतकरी नेते त्यांच्या…

What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : ‘राज ठाकरेही राहुल गांधींच्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी येणार का?’ उद्धव ठाकरे म्हणाले, “आम्ही दोघं…”

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु झाल्या आहेत. त्याविषयीच्या एका प्रश्नाबाबत काय म्हणाले…

Mumbai Municipal Corporation election, Uddhav Thackeray Raj Thackeray alliance,
“ठाकरे बंधूना मुंबईत चांगले यश”…असे कोणते मातब्बर मंत्री म्हणाले? राजकारणात खळबळ का उडाली?

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तब्बल वीस वर्षांनंतर एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठी अस्मितेचा आणि हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून…

Bharatshet Gogawale on Dance Bar
“प्रत्येक बारमध्ये हिडीस-फिडीस…”, मनसेच्या खळ्ळखट्याकनंतर भरत गोगावले काय म्हणाले?

Bharatshet Gogawale on MNS : सगळ्याच बारमध्ये नाचगाणी चालतात अशातला काही भाग नाही. अनेक बारमध्ये ऑर्केस्ट्रा चालतात, असं मंत्री गोगावले…

Raj Thackeray orders MNS workers to resolve dispute
कोणाशी युती करायची ते माझ्यावर सोडा; अंतर्गत वाद मिटविण्याचे राज ठाकरेंचे मनसे कार्यकर्त्यांना आदेश

मुंबईसह राज्यभरात आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा रंगशारदा सभागृहात पार पडला.

Devendra Fadnavis on Nishikant Dubey
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांनी खासदार निशिकांत दुबेंना दिला सल्ला; म्हणाले, “अशा प्रकारची वक्तव्य…”

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत निशिकांत दुबे यांना मोलाचा सल्ला दिला आहे.

amit thackeray urges strong action against harassers in pune Amit Thackeray viral speech video news
Video : मुलींवर हात उचलणाऱ्यांचे हातपाय तोडून पोलिसांना द्या – अमित ठाकरे

उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना अमित ठाकरे म्हणाले की, मुलींवर हात टाकण्याचे प्रकार वाढले आहेत, अशांना त्यांचे हात पाय तोडून पोलिसांच्या…

ताज्या बातम्या