scorecardresearch

राज ठाकरे Videos

महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकीय पुढारी आहेत. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे (Uddhav Thackeray) चुलत भाऊ आहेत. राज ठाकरे यांचा जन्म १४ जून १९६८ रोजी मुंबईत झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्रीकांत ठाकरे आणि आईचे नाव कुंदा ठाकरे आहे. त्यांना २ मुले आहेत आणि त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे या मराठी चित्रपटसृष्टीतील छायाचित्रकार, निर्माता-दिग्दर्शक मोहन वाघ यांच्या कन्या आहेत. राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे हेदेखील आता राजकारणात सक्रिय झाले आहेत.


शिवसेनेत असताना भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून आणि जाहिर सभांमधून राज ठाकरेंनी आपल्या वक्तृत्व आणि नेतृत्व गुणांची चुणूक दाखवली. शिवसेनेत मतभेद झाल्यानंतर त्यांनी ९ मार्च २००६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पक्षाची स्थापना केली. मनसेची स्थापना होताच, परप्रांतियांचे राज्यात येणारे लोंढे, भूमिपुत्रांचे हक्क, मराठी भाषेला प्राधान्य, रेल्वेमध्ये होणारी उत्तर भारतीयांची नोकरभरती, मुंबईच्या समुद्रकिनारी होणारी छठपुजा या मुद्द्यांवरून जोरदार रणशिंग फुंकले.

मनसेने टोल विरोधात छेडलेले आंदोलनही लक्षवेधी ठरले. तसेच मशिदीवरील लाऊडस्पीकर आणि मुंबईत दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी मनसेने आक्रमक आंदोलन केले. राज ठाकरेंच्या आक्रमक आणि स्थानिक मुद्द्यांच्या राजकारणामुळे २००९ साली विधानसभा निवडणुकीत मनसेचे १३ आमदार निवडून आले होते. मात्र त्यानंतर पक्षाला गळती लागत २०१४ आणि २०१९ साली राज ठाकरेंना केवळ एक आमदार निवडून आणता आला.


राज ठाकरेंनी वेळोवळी घेतलेल्या राजकीय भूमिका अनेकदा वादात अडकल्या आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देत मनसेचे उमेदवार उभे केले, मात्र त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. २०१९ साली लोकसभा निवडणुकीदरम्यान ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत भाजपाच्या विरोधात त्यांनी जोरदार प्रचार केला. तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अधिकृतरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देत महायुतीचा घटक होणे पसंत केले. तसेच महाविकास आघाडीच्या विरोधात महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभाही घेतल्या.


Read More
Raj Thackerays social media posts orders given to supporters and spokespersons about mns morcha
Raj Thackeray Post: राज ठाकरे यांची सोशल मीडियावर पोस्ट, कार्यकर्ते, प्रवक्त्यांना दिले आदेश

मनसेच्यावतीने मीरा-भाईंदर येथे मंगळवारी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. अमराठी व्यापाऱ्यांच्या शक्तीप्रदर्शनाला प्रत्युत्तर म्हणून हा मोर्चा काढण्यात आला होता. या…

avinash jadhav ave a reaction on mira bhynder morcha for marathi bhasha and hindi bhasha controvercy
Avinash Jadhav: “असंच आमच्या विरोधात जात जा…”; अविनाश जाधवांचा पोलिसांना खोचक सल्ला

Avinash Jadhav: मिरा भाईंदरमध्ये आज (८ जुलै ) निघणाऱ्या मराठी भाषिक मोर्चापूर्वीच, मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास पोलिसांनी मनसे नेते अविनाश जाधव…

BJP MP Nishikant Dubey criticized Raj Thackeray over Marathi bhasha and thackeray brothers Vijayi Melava
“आपल्या घरात कुत्राही वाघ असतो, हिंमत असेल तर…”, भाजपा खासदाराने ठाकरे बंधूंना डिवचलं

BJP MP Reacts On Raj Thackeray Marathi Vijayi Melava: मीरारोड इथे एका व्यापाऱ्याला मराठी न बोलण्यावरून मारहाण झाल्याच्या प्रकरणी मनसेच्या…

sanjay raut gave a response to those who criticizing the Thackeray brothers raj thackeray and uddhav thackeray melava
“मिठाचा खडा टाकण्याचं काम…”; ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर टीका करणाऱ्यांना राऊतांचं प्रत्युत्तर

Sanjay Raut: खासदार संजय राऊत यांनी आज (७ जुलै) पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

ashish shelar criticized Thackeray brothers MNS Gajanan Kale gave a reply to ashish shelar
Ashish Shelar & Gajanan Kale: ठाकरे बंधूंवर भाजपाची टीका, मनसेच्या गजानन काळेंनी दिलं उत्तर

वरळी येथे पार पडलेल्या ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर भाजपा नेत्यांकडून सडकून टीका केली जात आहे. त्यावर आता शिवसेना ठाकरे गट आणि…

A soldier serving during the 26/11 attacks criticized Raj Thackeray over hindi controvercy
26/11 च्या हल्ल्यावेळी कार्यरत सैनिकाने राज ठाकरेंना सुनावले खडेबोल। मराठीचं राजकारण होतंय का?

Mumbai 26/11 Warrior Slams Raj Thackeray & MNS Workers Over Marathi Controversy: मुंबईतील ताज हॉटेलवर २६/११ च्या हल्ल्यानंतर दहशतवादविरोधी कारवायांमध्ये…

Raju Patil and Avinash Jadhav say about Raj Thackeray and Uddhav Thackeray being together in the municipality
राज व उद्धव ठाकरे पालिकेतही एकत्र? राजू पाटील व अविनाश जाधव काय म्हणाले?। Worli Melava

Raj Thackeray-Uddhav Thackeray Speech Live: हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन शासकीय आदेश रद्द करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयावर…

ताज्या बातम्या