scorecardresearch

राज ठाकरे Photos

महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकीय पुढारी आहेत. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे (Uddhav Thackeray) चुलत भाऊ आहेत. राज ठाकरे यांचा जन्म १४ जून १९६८ रोजी मुंबईत झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्रीकांत ठाकरे आणि आईचे नाव कुंदा ठाकरे आहे. त्यांना २ मुले आहेत आणि त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे या मराठी चित्रपटसृष्टीतील छायाचित्रकार, निर्माता-दिग्दर्शक मोहन वाघ यांच्या कन्या आहेत. राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे हेदेखील आता राजकारणात सक्रिय झाले आहेत.


शिवसेनेत असताना भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून आणि जाहिर सभांमधून राज ठाकरेंनी आपल्या वक्तृत्व आणि नेतृत्व गुणांची चुणूक दाखवली. शिवसेनेत मतभेद झाल्यानंतर त्यांनी ९ मार्च २००६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पक्षाची स्थापना केली. मनसेची स्थापना होताच, परप्रांतियांचे राज्यात येणारे लोंढे, भूमिपुत्रांचे हक्क, मराठी भाषेला प्राधान्य, रेल्वेमध्ये होणारी उत्तर भारतीयांची नोकरभरती, मुंबईच्या समुद्रकिनारी होणारी छठपुजा या मुद्द्यांवरून जोरदार रणशिंग फुंकले.

मनसेने टोल विरोधात छेडलेले आंदोलनही लक्षवेधी ठरले. तसेच मशिदीवरील लाऊडस्पीकर आणि मुंबईत दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी मनसेने आक्रमक आंदोलन केले. राज ठाकरेंच्या आक्रमक आणि स्थानिक मुद्द्यांच्या राजकारणामुळे २००९ साली विधानसभा निवडणुकीत मनसेचे १३ आमदार निवडून आले होते. मात्र त्यानंतर पक्षाला गळती लागत २०१४ आणि २०१९ साली राज ठाकरेंना केवळ एक आमदार निवडून आणता आला.


राज ठाकरेंनी वेळोवळी घेतलेल्या राजकीय भूमिका अनेकदा वादात अडकल्या आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देत मनसेचे उमेदवार उभे केले, मात्र त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. २०१९ साली लोकसभा निवडणुकीदरम्यान ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत भाजपाच्या विरोधात त्यांनी जोरदार प्रचार केला. तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अधिकृतरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देत महायुतीचा घटक होणे पसंत केले. तसेच महाविकास आघाडीच्या विरोधात महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभाही घेतल्या.


Read More
Satyacha Morcha in Mumbai
8 Photos
राज आणि उद्धव ठाकरेंची आक्रमक भाषणं, शरद पवारांचं महत्त्वाचं आवाहन; ‘सत्याचा मोर्चा’त काय घडलं?

महाविकास आघाडी आणि मनसेचा सत्याचा मोर्चा, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांची आक्रमक भाषणं.

raj-thackeray-mumbai-morcha-local-train
9 Photos
राज ठाकरेंच्या लोकल ट्रेन प्रवासाची चर्चा, ऐन गर्दीच्या वेळेला दादरहून मिळाली विंडो सीट; ट्रोलिंगही झालं

Raj Thackeray travel by Local Train: निवडणूक आयोगाच्या विरोधात काढलेल्या सत्याच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबई…

Raj-Thackeray-EVM-Malfunction-Speech (10)
9 Photos
“सभांना गर्दी, तरीही पराभव” ते “बॉसला एक मारा”, मनसे मेळाव्यात राज ठाकरे काय बोलले?

Raj Thackeray: कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात या मोर्चात सहभागी होण्यासाठी नागरिकांना आवाहन करताना राज ठाकरे यांनी, “सुट्टीची कारणे देऊ नका, बॉसला एक…

raj thackeray and uddhav thackeray
11 Photos
आमच्या भेटी कशाला मोजता? उद्धव ठाकरेंशी होणाऱ्या सततच्या भेटीवर राज ठाकरेंचं लक्ष्यवेधी वक्तव्य

Raj Thackeray on Meeting With Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गेल्या काही दिवसांपासून सतत भेटी-गाठी होत आहेत. यावर राज ठाकरेंनी…

Raj Thackeray Uddhav Thackeray Bhaubeej Celebration
9 Photos
Bhaubeej 2025: ठाकरेंची भाऊबीज, भाऊ एकत्र आल्यामुळे बहिणीही सुखावल्या; कौटुंबिक एकोप्याचे फोटो व्हायरल

Raj Thackeray Uddhav Thackeray Bhaubeej Celebration 2025: राज ठाकरे यांची सख्खी बहीण जयवंती देशपांडे यांच्या घरी भाऊबीज पार पडली.

Raj and Uddhav Thackeray
11 Photos
राज आणि उद्धव ठाकरेंच्या चार महिन्यांत नऊ भेटीगाठी, आता युतीची फक्त औपचारिक घोषणा बाकी

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची चार महिन्यांतली नववी भेट. ठाकरे बंधूंच्या युतीची औपचारिक घोषणा बाकी.

Raj Thackeray Kiaan Thackeray Diwali 2025
9 Photos
Photos: राजकारणाबरोबरच कुटुंबात रमणारे राज ठाकरे; शिवाजी पार्कात नातवाबरोबर साजरी केली दिवाळी

अमित ठाकरे यांनी शेअर केलेल्या फोटोंवर नेटकरी म्हणाले, ‘आजोबा हा नातवाचा पहिला दोस्त आहे’.

Raj Thackeray Speech News
7 Photos
Raj Thackeray : राज ठाकरेंचं भाषण चर्चेत; पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’ ते निवडणुकांवरुन सरकारला इशारा! काय प्रमुख मुद्दे?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज त्यांच्या भाषणातून पुन्हा एकदा व्हिडीओ लावत भाजपाला लक्ष्य केलं.

MNS Deepotsav 2025 Raj Uddhav Thackeray
12 Photos
Photos: दीपोत्सव मनसेचा, पण चर्चा ठाकरेंच्या सुनांची; रश्मी व शर्मिला ठाकरेंचा दिवाळी लूक पाहिलात का?

मनसेच्या दीपोत्सवाचे हे १३ वे वर्ष असल्याची माहिती मनसेचे उपशहर अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी दिली.

Sanjay Raut Grand Son Name Ceremony
9 Photos
संजय राऊत झाले आजोबा, नातवाच्या बारश्याला राज-उद्धव आले एकत्र; सुप्रिया सुळेंनी शेअर केले खास फोटो!

पूर्वशी राऊतने ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचा मुलगा मल्हार नार्वेकरबरोबर २९ नोव्हेंबर २०२१ रोजी लग्नगाठ बांधली.

Who is Meenatai Thackeray
9 Photos
Who is Meenatai Thackeray: मीनाताई ठाकरे कोण आहेत? त्यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर दोन्ही शिवसेना, मनसेमध्ये संतापाचे वातावरण का?

Who is Meenatai Thackeray: मुंबईतील दादर येथे असलेल्या शिवाजी पार्कजवळ असलेले दिवंगत मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना केल्यानंतर राजकारण तापले…

ताज्या बातम्या