scorecardresearch

रामनाथ कोविंद News

रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांचा जन्म १ ऑक्टोबर १९४५ रोजी कानपूरजवळील एका छोट्याशा गावात झाला. कोविंद हे भारताचे १४ वे राष्ट्रपती असून त्यांनी २५ जुलै २०१७ रोजी राष्ट्रपती पदाची सूत्रं हाती घेतली. त्यांनी कानपूर विद्यापीठातून कॉमर्सची पदवी आणि कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांनी दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात मिळून सुमारे १६ वर्षे वकिली केली आहे.

राष्ट्रपती बनण्यापूर्वी त्यांनी इतरही अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. २०१५ ते २०१७ दरम्यान रामनाथ कोविंद यांनी बिहारचे राज्यपाल म्हणून कामकाज पाहिलं आहे.

तसेच एप्रिल १९९४ ते मार्च २००६ दरम्यान सलग १२ वर्षे ते राज्यसभेचे खासदार म्हणूनही निवडून आले होते. रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात स्वयंसेवक म्हणून देखील काम केलं असून त्यांनी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
Read More
RSS decided to invite Ram Nath Kovind as its chief guest for centenary Vijayadashami Utsav
RSS च्या विजयादशमी सोहळ्याला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद मुख्य अतिथी; माजी राष्ट्रपतींना आमंत्रित करण्याचे कारण काय?

Ram Nath Kovind RSS event यंदा संघाचा शताब्दी वर्षातील ऐतिहासिक विजयादशमी सोहळा २ ऑक्टोबर रोजी नागपूरमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

Kharge makes gaffe on Presidents names (1)
काँग्रेस अध्यक्षांकडून आजी-माजी राष्ट्रपतींचा अपमान? भाजपाने नेमके काय आरोप केले? प्रकरण काय?

Presidents names controversy Mallikarjun Kharge काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी छत्तीसगडमधील आपल्या भाषणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि माजी राष्ट्रपती रामनाथ…

loksatta editorial one nation one election
अग्रलेख: होऊन जाऊ दे…!

पैशाचा अपव्यय खरोखरच टाळावयाचा असेल तर पैशाचा पाऊस पाडून पक्ष फोडण्याचे आणि सरकारे पाडण्याचे उद्योग आधी थांबवायला हवेत…

one nation one election
विश्लेषण : ‘एक देश, एक निवडणूक’ संकल्पनेबाबत विरोधकांचे आक्षेप अन् कोविंद समितीचं उत्तर; वाचा सविस्तर…

कोविंद समितीने त्यांच्या अहवालात संविधान संशोधनाबरोबरच अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या शिफारशी केल्या आहेत. तसेच विरोधकांनी घेतलेल्या आक्षेपांची दखलही या समितीकडून…

Draupadi Murmu
अन्वयार्थ: एक राष्ट्र, एक निवडणूक व्यवहार्य आहे का? प्रीमियम स्टोरी

एकत्रित निवडणुका घेण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील उच्चाधिकार समितीने आपला २१ खंडांचा व १८ हजारांपेक्षा…

The panel led by Ram Nath Kovind submitted the report on simultaneous elections.
एक राष्ट्र एक निवडणूक घेता येईल? रामनाथ कोविंद यांच्या अहवालात काय म्हटलंय? ही कल्पना किती व्यावहारिक?

राष्ट्रीय स्तरावरील ताकदवान पक्षाकडे चांगली संघटनात्मक बांधणी असून, तो प्रादेक्षिक पक्षांपेक्षा जास्त फायदा मिळवू शकतो. तसेच प्रादेशिक मुद्द्यांपेक्षा राष्ट्रीय समस्यांना…

one nation one election
“एकाच वेळी लोकसभा-विधानसभा, नंतर स्थानिक स्वराज्य संस्था”, ‘एक राष्ट्र, एक निवडणुकी’बाबत रामनाथ कोविंद समितीचा अहवाल सादर

एक राष्ट्र, एक निवडणुकीबाबत अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या कोविंद समितीने त्यांच्या अहवालात अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या शिफारसी केल्या आहेत.

law commission makes presentation to kovind panel on one nation one election
‘एक देश, एक निवडणूक’वर विस्तृत चर्चा; माजी राष्ट्रपती कोविंद यांच्यासमोर विधि आयोगाचे सादरीकरण

कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पहिल्या बैठकीनंतरच सर्व राजकीय पक्षांना पत्र पाठवून त्यांची भूमिका मांडण्याची सूचना केली आहे.

one nation one poll ex president kovind led committee holds first meeting
एक निवडणूक संकल्पनेबाबत पक्ष, विधि आयोगाला आमंत्रण; उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत निर्णय

समिती एकाचवेळी निवडणुका घेण्याच्या मुद्दय़ावर विधि आयोगाच्याही सूचना आणि मते समजून घेण्यासाठी आमंत्रित करेल, असे विधि मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले…

Gulam Nabi Azad BJP Handler
‘गुलाम नबी आझाद भाजपा-संघाच्या इशाऱ्यावर काम करतात’, काँग्रेस-पीडीपीची टीका

गुलाम नबी आझाद यांची ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ यासाठी गठित केलेल्या समितीमध्ये निवड केल्यानंतर काँग्रेस आणि पीडीपीने त्यांच्यावर भाजपा-संघाची व्यक्ती…