scorecardresearch

शरद पवार News

sharad pawar

शरद पवार हे भारतातील प्रमुख राजकारण्यांपैकी एक आहेत. शरद पवारांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी पुण्यातील बारामती तालुक्यात झाला. ५० वर्षांहून अधिक काळ संसदीय राजकारण करणारे नेते म्हणून शरद पवारांकडे पाहिले जाते. काँग्रेसपासून वेगळे होऊन त्यांनी १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP) स्थापना केली. मात्र २०२३ साली झालेल्या पक्षातील फुटीनंतर आता त्यांच्या पक्षाचे नाव “राष्ट्रवादी कांग्रेस – शरदचंद्र पवार पक्ष”, असे आहे. तर मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांचे पुतणे अजित पवार यांच्याकडे आहे.


शरद पवारांनी १९६० मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश घेत आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. १९६७ मध्ये ते पहिल्यांदा बारामतीमधून विधानसभेवर निवडून आले आणि १९७८ मध्ये महाराष्ट्राचे सर्वात कमी वयातील मुख्यमंत्री झाले. त्यांनी तीन वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले. १९८४ मध्ये ते लोकसभेवर निवडून गेले. केंद्रातही त्यांनी संरक्षण मंत्री, कृषी मंत्री अशी महत्त्वाची खाती सांभाळून त्यावर आपली छाप सोडली. राजकारणाबरोबरच शरद पवार यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) चे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.


आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप, अंडरवर्ल्ड संबंध याशिवाय अनेक वाद झाले. तरीही चाणाक्ष पुढाऱ्याप्रमाणे त्यांनी विविध पक्षांसह युती करुन आपले राजकीय अस्तित्व आजही अबाधित ठेवले आहे. २०१९ साली विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवारांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षांना एकत्र आणत महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी करून दाखविला. शरद पवारांच्या या खेळीमुळे १०६ आमदार असलेल्या भाजपाला अडीच वर्ष सत्तेपासून दूर राहावे लागले.


२०२३ मध्ये शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी बंड करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा घेतला. सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र विधिमंडळात अजित पवार हा दावा टिकवण्यात यशस्वी झाले. पक्ष फुटीनंतरही शरद पवार यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कडवी झुंज देत १० उमेदवारांपैकी ८ उमेदवार जिंकून आणण्यात यश मिळवले. तर दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाला एकच खासदार निवडून आणता आला. या निवडणुकीत शरद पवार यांच्यावर वैयक्तिक टीका झाली. ते नेतृत्व सोडत नसल्याचा आरोप अजित पवार आणि त्यांच्याबरोबरच्या नेत्यांनी केला. तरीही हे हल्ले पचवून शरद पवारांनी आपल्या पक्षाला यश मिळवून दिले.


Read More
Pratap Sarnaik Meets Sharad Pawar Ahead of MCA Election vihang sarnaik in presidential race
मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुलगा ‘विहंग’साठी शरद पवारांना टाकला शब्द

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी ‘राष्ट्रवादी काँग्रेस’चे अध्यक्ष शरद पवार यांची…

Maharashtra News Update: गंभीर वाटणारे अजित दादा गमतीशीर, तर हसरे मुख्यमंत्री गंभीर कसे झाले? खुद्द फडणवीसांनींच सांगितले…

Maharashtra News Today: राज्यात येत्या काही आठवड्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच…

MCA Museum
MCA Museum: मुंबई क्रिकेटचा इतिहास मांडणारं MCA संग्रहालय! तिकीट किती अन् काय काय पाहायला मिळणार?

MCA Sharad Pawar Cricket Museum Attractions: माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा यांच्यासह मुंबईच्या महान क्रिकेटपटूंचा गौरवशाली…

Maharashtra-News
Maharashtra News Update : ‘काही राजकीय फटाक्यांच्या…’, अर्जून खोतकरांची दानवे आणि गोरंट्याल यांच्यावर अप्रत्यक्ष टीका

Maharashtra Breaking News Today : राजकीय व इतर सर्व महत्वाच्या घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

Senior leader Sharad Pawar made a statement
देशावर संकट आल्यावर मदतीसाठी ‘मोठे’ लोक माझे नाव घेतात… शरद पवार असे का म्हणाले?

काम द्यायचे असेल, तर बारामतीच्या तरुणांना द्यावे, असा संदेश देशात गेला पाहिजे,’ असे वक्तव्य ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.

Maharashtra Sahabrao centenary Hind Kesari National Wrestling Competition Satara Sharad Pawar
क्रीडामहर्षी साहेबराव पवारांच्या शतकपूर्ती वर्षाला आदरांजली! पुरुष, महिला हिंदकेसरी स्पर्धेचे साताऱ्यात आयोजन…

Hind Kesari, Satara : भारतीय शैली कुस्ती महासंघाच्या मान्यतेने होणाऱ्या या स्पर्धेत देशभरातील २६ राज्यांतून सुमारे ८०० पुरुष आणि महिला…

Rohit-Pawar-Sharad-Pawar
Rohit Pawar : “सत्तेच्या धुंदीत असलेल्या सरकारला…”, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक, देहूत उपोषण करणार

राज्य सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला नाही. याच मुद्यांवरून आता शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे.

ncp ex mayor mainuddin bagwan
शरद पवार गटाचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांचा वेगळा मार्ग, स्वतंत्र आघाडी नोंदणीतून दबावाचे राजकारण

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जनसुराज्य शक्तीचे समित कदम यांनी पक्षप्रवेशाचा धडाका लावला असून, यामागे महापालिका निवडणुकीची रणनीतीच दिसून येते.

ncp internal conflict sharad pawar group anil Deshmukh amar Kale Wardha
“खासदार व माजी मंत्री हेच कटकारस्थानी, त्यांना पक्ष तालुक्यापुरता ठेवायचाय!”, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याचा आरोप…

Anil Deshmukh : अनिल देशमुख आणि अमर काळे हेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विदर्भातील सूत्रधार बनून मनमानी कारभार करत असल्याचा…

ताज्या बातम्या