scorecardresearch

शार्दुल ठाकूर News

शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) हा भारतीय क्रिकेटपटू आहे. तो उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करतो. त्यासह शेवटच्या फळीमध्ये फलंदाजी करण्याचा अनुभवही शार्दुलकडे आहे. अंगी असलेल्या कौशल्यामुळे त्याला लॉर्ड हे टोपननाव पडले आहे. शार्दुलचा जन्म १६ ऑक्टोबर १९९१ रोजी महाराष्ट्रातील पालघरमध्ये झाला. शालेय जीवनामध्येच त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. क्रिकेटचे प्रशिक्षण घेण्यासाठी तो पालघरवरुन दक्षिण मुंबईला लोकलने प्रवास करत यायचा. मेहनत आणि चिकाटी या गुणांमुळे त्याचा खेळ दिवसेनदिवस चांगला होत गेला.


कमी उंची आणि जास्तीचे वजन या गोष्टींमुळे सुरुवातीच्या काळात शार्दुलवर टीका केली जात असे. असे असतानाही त्याने मुंबईच्या संघात स्थान पटकावले. २०१२-१३ च्या रणजी स्पर्धेमध्ये त्याने मुंबईकडून खेळत पदार्पण केले. २०१३-१४ च्या रणजी ट्रॉफीमध्ये त्याने सहा सामन्यांमध्ये २६.२५ च्या सरासरीने २७ गडी बाद केले. पुढच्या हंगामामध्ये त्याने दहा रणजी सामन्यांमध्ये २०.८१ च्या सरासरीने ४८ गडी बाद केले. तेव्हा शार्दुलने ५ सामन्यांमध्ये ५ गडी बाद करण्याचा विक्रम देखील केला. पुढे त्याला रणजी, विजय हजारे ट्रॉफीसह अन्य स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. २०१५-१६ मध्ये रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यामध्ये शार्दुलने सौराष्ट्र संघाच्या आठ फलंदाजांना बाद करत मुंबईला जेतेपद मिळवून दिले.


२०१५ च्या आयपीएल (IPL) हंगामामध्ये त्याच्यावर किंग्स इलेवन पंजाब या संघाने बोली लावली. २०१५ आणि २०१६ या दोन वर्षांमध्ये तो पंजाबकडून खेळला. पुढे २०१७ मध्ये राइजिंग पुणे सुपरजायंट्समध्ये शार्दुल ठाकूर सामील झाला. या काळात त्याचा खेळ आणखी चांगला होत गेला. तो ऑल-राऊंडर म्हणून देखील नावारुपाला आला. पुणे नंतर त्याला चेन्नईच्या संघातून खेळण्याची संधी मिळाली. ३ वर्ष सीएसकेकडून खेळल्यानंतर लिलावामध्ये त्याच्यावर दिल्ली संघाकडून बोली लावण्यात आली. २०२३ पासून तो कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग आहे.


शार्दुलने ऑगस्ट २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय एकदिवसीय फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. पुढे फेब्रुवारी २०१८ मध्ये त्याने टी-२० मध्येही पदार्पण केले. त्याच वर्षी ऑक्टोबर २०१८ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्धचा त्याचा पहिला कसोटी सामना होता. एकूण आंतरराष्ट्रीय कारकीर्दीमध्ये त्याने ८ कसोटी सामन्यांमध्ये २५४ धावा केल्या आहेत, तर २९ गडी बाद केले आहेत; ३५ एकदिवसीय सामन्यांमध्ये २९८ धावा केल्या आहेत, तर ५० गडी बाद केले आहेत; २५ टी-२० सामन्यांमध्ये ६९ धावा केल्या आहेत, तर ३३ फलंदाजांना बाद केले आहे. आगामी आशिया कप २०२३ च्या भारतीय संघामध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. शार्दुल ठाकूरला विश्वचषक स्पर्धेमध्ये संधी मिळू शकतो असे म्हटले जात आहे.



Read More
Shardul Thkur Statement on Shubman Gill About Bowling Changes and Giving Less Over Said Captain Decided That
IND vs ENG: “ते कर्णधार ठरवतो, माझ्या हातात…”, शार्दुल ठाकूरचं शुबमन गिलबाबत मोठं वक्तव्य; कमी षटकं देण्याविषयी काय म्हणाला?

Shardul Thakur on Shubman Gill: शार्दुल ठाकूरने कर्णधार शुबमन गिलबाबत दिलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे.

Ben Duckett Sensational Diving Catch to Dismiss Shardul Thakur on Ben Stokes Bowling Video Viral
IND vs ENG: काय जबरदस्त झेल घेतलाय! लॉर्ड ठाकूरला बाद करण्यासाठी डकेटने हवेत झेप घेत टिपला अनपेक्षित कॅच; VIDEO व्हायरल

Shardul Thakur Wicket: मँचेस्टर कसोटीत लॉर्ड शार्दुल ठाकूरने शानदार फलंदाजी करत भारताचा डाव सावरला. पण बेन डकेटच्या कमालीच्या झेलवर तो…

ben duckett
IND vs ENG: क्रॉली- डकेटची दमदार सुरूवात! दुसऱ्या दिवशी काय घडलं? पाहा हायलाईट्स

IND vs ENG Highlights: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याचा थरार मँचेस्टरमध्ये सुरू आहे. पाहा या सामन्यातील संपूर्ण अपडेट्स.

shardul thakur
IND vs IND A: मुंबईकर शार्दुल इंग्लंडमध्ये गरजला! दमदार शतक अन् गोलंदाजीत ४ विकेट्स; प्लेइंग ११ मध्ये जागा फिक्स?

Shardul Thakur Century In IND vs IND A Match: भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरने भारतीय संघाविरूद्ध झालेल्या सराव सामन्यात…

team india
IND vs ENG: पहिल्या कसोटीसाठी माजी प्रशिक्षकाने निवडली भारताची प्लेइंग ११; दोन प्रमुख खेळाडूंना ठेवलं संघाबाहेर

Sanjay Bangar Playing 11 Prediction For Ind vs Eng 1st Test: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या पहिल्या कसोटी…

team india
IND vs ENG: मालिका सुरू होण्याआधीच गिलचं टेन्शन वाढलं! अनुभवी खेळाडू इंग्लंडमध्ये ठरतोय फ्लॉप

IND A vs England Lions: भारतीय अ संघ आणि इंग्लंड लायन्स या दोन्ही संघांमध्ये दुसरा अनधिकृत सामना सुरू आहे. या…

team india
Team India: रोहितच्या खास मित्राला टीम इंडियात संधी मिळणार? मुंबईकर खेळाडू १८ महिन्यांनंतर कमबॅक करणार

Shardul Thakur: येत्या काही दिवसांत इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड केली जाणार आहे .या दौऱ्यासाठी शार्दुल ठाकूरला भारतीय संघात संधी…

Rohit Sharma Fun Banter with Shardul Thakur During Net Practice Video Viral MI vs LSG IPL 2025
VIDEO: “काय रे ए हिरो, घरची टीम आहे तुझ्या…”, रोहित शर्माने शार्दुल ठाकूरला मैदानावर सुनावलं; नेमकं काय झालं?

Rohit Sharma Shardul Thakur Video: रोहित शर्मा आणि शार्दुल ठाकूरचा एक व्हीडिओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. ज्यामध्ये रोहित…

Shardul Thakur reacts strongly to commentators’ criticism during a press interaction.
Shardul Thakur: “आधी स्वतःची आकडेवारी पाहा”, टीका करणाऱ्या समालोचकांवर शार्दुल ठाकूर संतापला

Shardul Thakur: शार्दुल ठाकूरने सहा सामन्यांमध्ये १०.३८ च्या इकॉनॉमी रेटने ११ विकेट्स घेतल्या आहेत. गुजरात टायटन्सवर विजय मिळवल्यानंतर, लखनै सुपर…

Shardul Thakur Bowled 5 Wide in 13th over with 11 balls But Took wicket of Ajinkya Rahane KKR vs LSG IPL 2025
KKR vs LSG: ११ चेंडूचं षटक! शार्दुल ठाकूरच्या षटकात मोठा ड्रामा, अखेरच्या चेंडूवर शेवटी अशी मिळवली विकेट; नेमकं काय घडलं?

KKR vs LSG Shardul Thakur: शार्दुल ठाकूरने केकेआरविरूद्ध सामन्यात ११ चेंडूचं षटक टाकलं. शार्दुल ठाकूरच्या या नाट्यमय षटकात अखेरीस त्याने…

Rohit Sharma Statement on Shardul Thakur to Sanjiv Goenka Viral video LSG vs MI IPL 2025
LSG vs MI: “सर तुम्ही कशाला चिंता करता…”, रोहित शर्माने शार्दुल ठाकूरचं नाव घेत संजीव गोयंकाना विचारला प्रश्न; VIDEO व्हायरल

LSG vs MI IPL 2025: मुंबई इंडियन्स वि. लखनौ सुपर जायंट्स सामन्यानंतर रोहित शर्माने लखनौचे मालक संजीव गोयंका यांना प्रश्न…

ताज्या बातम्या