scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

शुबमन गिल Photos

Shubman Gill

शुबमन गिल (Shubman Gill) हा भारतीय क्रिकेटपटू आहे. त्याचा जन्म ८ सप्टेंबर १९९९ रोजी पंजाबमध्ये झाला. त्याच्या वडिलांना क्रिकेटपटू बनण्याची इच्छा होती. लहानपणी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्याने क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. प्रशिक्षणासाठी ते मोहाली येथे राहायला गेले. त्यानंतर शुबमनला पंजाबच्या संघाकडून (Punjab Team)खेळायची संधी मिळाली. राज्यस्तरीय अंडर-१६ स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. २०१६-१७ मध्ये त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. पुढच्या वर्षी त्याला रणजी स्पर्धेमध्ये खेळायची संधी मिळाली. या दोन्ही महत्त्वपूर्ण स्पर्धोंमध्ये शुबमनने चांगला खेळ करत अनेक विक्रम केले. पुढे त्याला देवधर ट्रॉफीमध्ये इंडिया-सीकडून खेळला.


राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये कौशल्य दाखवल्यानंतर २०१८ मध्ये शुबमन गिल अंडर-१९ विश्वचषकासाठीच्या भारतीय संघामध्ये सामील झाला. त्याच्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. झालेल्या एकूण सामन्यांमध्ये त्याने १२४.०० च्या सरासरीने ३७२ धावा केल्या. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये त्याने नाबाद १०२ धावा केल्या. शुबमन अंडर-१९ विश्वचषकामध्ये स्टार प्लेयर म्हणून झळकला. त्याच वर्षी झालेल्या आयपीएलमध्ये शुबमन गिल या तरुण खेळाडूवर कोलकाता नाइट रायडर्स संघाने सर्वाधिक बोली लावली. २०१८-२०२१ या काळामध्ये तो केकेआरकडून खेळला. पुढे रिटेन न केल्याने २०२२ मध्ये तो गुजरात टायटन्स या संघात सामील झाला. २०२३ च्या आयपीएलच्या १६ व्या हंगामामध्ये त्याने तुफान फलंदाजी करत ऑरेन्ज कॅप मिळवली होती.


२०१९ मध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताच्या संघात शुबमन गिलचा समावेश करण्यात आला. अशा प्रकारे त्याने एकदिवसीय क्रिकेट फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. पुढे २०२० मध्ये तो पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला. तर २०२३ मध्ये त्याला भारतीय संघातून टी-२० सामना खेळायची संधी मिळाली. एकूण आंतरराष्ट्रीय कारकीर्दीमध्ये शुबमन गिलने १८ कसोटी सामन्यांमध्ये ९६६, २७ एकदिवसीय सामन्यांमध्ये १,४३७ आणि ४५ टी-२० सामन्यांमध्ये २९५ धावा केल्या आहेत. आयपीएल तसेच आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये उत्तम खेळ दाखवल्याने भारतीय संघात त्याने जागा पक्की केली आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मासह सलामीवीर म्हणून त्याची निवड करण्यात आली आहे. येत्या आशिया कप २०२३ मध्येही त्याचा समावेश सलामीवीर फलंदाज म्हणून करण्यात आला आहे. आशिया कपसह विश्वचषकामध्ये शुबमन दिलेली जबाबदारी पार पाडेल अशी चाहत्यांना आशा आहे.


क्रिकेटव्यतिरिक्त शुबमन त्याच्या फिटनेससाठीही प्रसिद्ध आहे. त्याने ‘स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ या चित्रपटातील पवित्र प्रभाकर या पात्राच्या पंजाबी डबिंगसाठी आवाज दिला आहे. अनेक अभिनेत्रीशी त्याचे नाव जोडले जात आहे.


Read More
ICC Mend ODI Rankings - Batter
11 Photos
ICC ODI Rankings : आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत भारतीय फलंदाजांचा दबदबा, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी

ICC Mens ODI Rankings : आयसीसीच्या क्रमवारीनुसार टॉप १० एकदिवसीय फलंदाज आणि त्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊया.

Asia Cup 2025 India squad announced
9 Photos
Asia Cup 2025: कर्णधार स्काय, उपकर्णधार गिल; बुमराहही संघाचा भाग! आशिया चषकासाठी भारतीय संघ सज्ज

१४ सप्टेंबर २०२५ पासून दुबई येथे होणाऱ्या या स्पर्धेच्या गट फेरीतील लढतींमध्ये भारत पाकिस्तानशी सामना करणार आहे. अंतिम सामना २८…

Raksha Bandhan 2025, Virat Kohli sister, Star Indian cricketers and their sisters
7 Photos
राजकीय पुढारी ते व्यवस्थापक; विराट कोहली, शुबमन गिलसह भारताच्या ‘या’ स्टार क्रिकेटर्सच्या बहिणी काय काम करतात?

Raksha Bandhan 2025: बहिण-भावाच्या अतूट नात्याचा पवित्र रक्षाबंधनाचा सण देशभर साजरा होत आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने भारतातील स्टार क्रिकेटपटूंच्या बहिणी काय…

Shubman Gill
8 Photos
Shubman Gill Net Worth : इंग्लंडच्या गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या ‘प्रिन्स’ शुभमन गिलची संपत्ती किती? ‘या’ माध्यमातून करतो कमाई

Shubman Gill Net Worth : भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार शुभमन गिलने इंग्लडविरोधात सलग दोन सामन्यात शतक झळकावले आहे.

Shubhaman Gill's affair
9 Photos
सारा तेंडुलकर ते अनन्या पांडे; कर्णधार शुबमन गिलचे नाव ‘या’ अभिनेत्रींबरोबर जोडले गेले आहे, पण तथ्य काय आहे?

India vs England, Shubman Gill : शुबमन गिलचे नाव आतापर्यंत अनेक सुंदरींशी जोडले गेले आहे, नुकतेच त्याने इग्लंडविरूद्ध कसोटी सामन्यात…

shubman gill
7 Photos
Team India: कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे भारतीय कर्णधार; यादीत धोनीचाही समावेश

Highest Score By Indian Captain: कोण आहेत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे भारतीय कर्णधार? जाणून घ्या.

Yashasvi Jaiswal
9 Photos
Shubman Gill: “आज मला द्रविड आणि गांगुलीची आठवण झाली”, गिल-जयस्वालच्या शतकी खेळीनंतर मास्टर ब्लास्टर असे का म्हणाला?

Shubman Gill Century: भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला असून, यामध्ये भारत इंग्लंड विरोधात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

Indian Captains with Test Wins in ENG
9 Photos
इंग्लंडमध्ये भारताने जिंकले आहेत फक्त ९ कसोटी सामने; कर्णधार शुबमन गिल कोहलीचा विक्रम मोडू शकेल का?

India vs England : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका २० जूनपासून सुरू होत आहे. शुभमन गिल इंग्लंड…

top 10 Indians with most test wickets in England ishant sharma Kapil dev jasprit bumrah
10 Photos
कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे १० भारतीय गोलंदाज; जसप्रीत बुमराह कितव्या स्थानी?

भारत आणि इंग्लंड संघ तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसाठी सज्ज झाले आहेत. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २० जूनपासून हेडिंग्ले येथे खेळला…

ताज्या बातम्या