scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

राज्य परिवहन Videos

महाराष्ट्रभर रेल्वेचे जाळे पसरले असले, तरी आजही लोक एसटीने प्रवास करतात. ‘गाव तेथे एसटी’ किंवा ‘रस्ता तेथे एसटी’ हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे ब्रीदवाक्य आहे. यावरुनच एसटी महामंडळ (State Transport) महाराष्ट्रातील खेड्यापासून शहरापर्यंत पसरलेले असल्याचे समजते.

महाराष्ट्रात एकूण ३१ विभागातून एसटीचे विभागीय कामकाज होते. त्याचप्रमाणे एसटी महामंडळाकडून राज्यांअंतर्गत सेवा देखील पुरविली जाते. १९३२ मध्ये सार्वजनिक वाहनांद्वारे प्रवासाला सुरुवात झाली. पुढे प्रवास आणि सामानाची दळण वळण यासाठी वाहतुक नियमन करण्याची गरज भासू लागली.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९४८ मध्ये बॉंबे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉपोर्रेशन (बीएसआरटीसी) या नावाने प्रवासी वाहतूक करण्यासाठी सरकारी कंपनी स्थापन करण्यात आली. १९६० मध्ये महाराष्ट्र राज्यांची निर्मिती झाल्यावर या प्रभागातील वाहतूक संस्था बीएसआरटीसीमध्ये विलीन करून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (MSRTC) सुरुवात झाली.
Read More