India vs Australia, U19 World Cup Final : दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आलेल्या यंदाच्या १९ वर्षांखालील विश्वचषक (युवा विश्वचषक) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ७९ धावांनी पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांमध्ये ७ बाद २५३ धावा केल्या होत्या. त्यानंतर २५४ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेला भारतीय संघ सपशेल अपयशी ठरला. भारताचा युवा संघ संपूर्ण ५० षटकंदेखील खेळू शकला नाही. उदय सहारनचा संघ ४३.५ षटकांत केवळ १७४ धावांपर्यंत मजल मारू शकला.

भारतीय संघ विश्वचषक जिंकू शकला नसला तरी या स्पर्धेतून अनेक नवे खेळाडू भारताला मिळाले आहेत. भारताचा कर्णधार उदय सहारन याने या स्पर्धेत सर्वाधिक धावा फटकावल्या आहेत. तर मुशीर खान याने दोन शतकांसह ३३८ धावा फटकावल्या आहे. सचिन धस आणि अर्शीन कुलकर्णी या महाराष्ट्रातील दोन खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यासह राज लिंबानी, नमन तिवारी या गोलदाजांनीदेखील लक्षवेधी कामगिरी केली आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी लिलावात सर्वांचं लक्ष या खेळाडूंकडे असेल. पुढे या खेळाडूंनी आयपीएलमध्येदेखील चांगली कामगिरी केली तर त्यांच्यासाठी वरिष्ठ भारतीय संघाचे दरवाजे उघडले जाऊ शकतात.

jyoti surekha vannam
ज्योतीची सुवर्ण हॅट्ट्रिक;  विश्वचषक तिरंदाजीमध्ये कम्पाऊंड प्रकारात भारताला पाच पदके
Indian men women team entered archery world cup 2024 finals
भारतीय तिरंदाजांची पदकनिश्चिती; पुरुष, महिला कम्पाऊंड संघ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत; प्रथमेश, सुरेखाची चमक 
Bernd Holzenbein dead at 78
माजी फुटबॉलपटू होल्झेनबाइन यांचे निधन
pv sindhu
सिंधूची उबर चषक बॅडमिंटन स्पर्धेतून माघार; थॉमस चषकासाठी भारताचा मजबूत संघ

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) दर दोन वर्षांनी एकोणीस वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचं आयोजन करते. या स्पर्धेद्वारे प्रत्येक देशाला काही उदयोन्मूख खेळाडू गवसतात. हे खेळाडू पुढे त्या-त्या देशाच्या वरिष्ठ संघांचं नेतृत्व करतात. युवराज सिंह, शिखर धवन, विराट कोहली, केन विलियम्सन, डेव्हिड वॉर्नर, मायकेल क्लार्क, मिचेल जॉन्सन, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, सलमान बट, रॉस टेलर, हशीम आमला, ऑईन मॉर्गन, मुशफिकूर रहिम, मुस्तफिजूर रहमान, स्टीव्ह स्मिथ, राशिद खान ही त्यापैकीच काही मोठी नावं आहेत. तर शुबमन गिल, मार्को यान्सन ही या यादीतली काही नवीन उदाहरणं आहेत.

दर दोन वर्षांनी ही स्पर्धा खेळवली जाते. परंतु, या स्पर्धेत आपापल्या देशांचं प्रतिनिधीत्व करणारे किती खेळाडू पुढे त्या-त्या देशाच्या वरिष्ठ संघांचं प्रतिनिधीत्व करतात असा प्रश्न समाजमाध्यमांवर उपस्थित केला गेला. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कने याचं उत्तर दिलं आहे.

हे ही वाचा >> U19 WC Final : कर्णधाराचा ‘तो’ निर्णय अन् भारताने विश्वचषक गमावला, मोहम्मद कैफने केलं पराभवाचं विश्लेषण

१९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत खेळणारे किती खेळाडू पुढे वरिष्ठ संघाकडून खेळतात?

बांगलादेश ४१%
अफगाणिस्तान ३८%
वेस्ट इंडीज ३६%
झिम्बाब्वे ३४%
पाकिस्तान ३३%
श्रीलंका ३३%
न्युझीलंड ३२ %
आयर्लंड ३१%
इंग्लंड २८%
भारत २७%
ऑस्ट्रेलिया २०%
साऊथ आफ्रिका १८%