IND vs AUS Ricky Ponting advises Steve Smith and Marnus Labuschagne to learn from Virat Kohli : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या उर्वरित चार कसोटी सामन्यांमध्ये फॉर्ममध्ये परतण्यासाठी स्टीव्ह आणि मार्नस यांना भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीप्रमाणेच आपल्या खेळावर विसंबून राहण्याचा सल्ला दिला आहे. पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात मार्नस लॅबुशेन भारतीय वेगवान गोलंदाजांविरुद्ध संघर्ष करताना दिसला. या सामन्यात त्याने दोन आणि तीन धावा केल्या. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला २९५ धावांनी दारूण पराभवाला सामोरे जावे लागले.

स्मिथला पहिल्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजविरुद्धही संघर्ष करावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या या स्टार फलंदाजाला पहिल्या डावात खातेही उघडता आले नाही, तर दुसऱ्या डावात त्याने ६० चेंडूत १७ धावा केल्या. आयसीसीच्या रिव्ह्यूमध्ये पॉन्टिंग म्हणाला, “पर्थमधील सर्व फलंदाजांपैकी मार्नसला सर्वात जास्त संघर्ष करताना दिसला. हे खरे आहे की खेळपट्टी अवघड होती आणि भारतीय गोलंदाज चमकदार गोलंदाजी करत होते पण त्यांना बदलण्याचा मार्ग शोधावा लागेल.

Jasprit Bumrah and Tabraiz Shamsi have similar T20I stats
Jasprit Bumrah : तबरेझ शम्सीच्या पोस्टने क्रिकेट विश्वाला दिला आश्चर्याचा धक्का! जसप्रीत बुमराहबरोबर घडला असा योगायोग की विश्वासच बसणार नाही
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What Revanth Reddy Said?
Revanth Reddy : “महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आल्यास मुस्लिम आरक्षण…”, रेवंथ रेड्डी काय म्हणाले?
raj thackeray switzerland incident
“ए आजी तुला बोललो ना…”; राज ठाकरेंनी सांगितला स्वित्झर्लंडमधील भन्नाट किस्सा!
Savlyachi Janu Savli
Video : “तारा आणि भैरवीचे सत्य…”, जगन्नाथचा प्लॅन यशस्वी होणार? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट
Udayanraje Bhosale criticism of Sharad Pawar candidate
पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र
Maharashtra Elections Assembly Elections 2024 Election Commission
महाराष्ट्र वाहून जाणार की आपली वेगळी वाट आखणार?

रिकी पॉन्टिंगचा लॅबुशेन-स्मिथला सल्ला –

या संदर्भात ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने कोहलीचे उदाहरण दिले, जो पहिल्या डावात पाच धावा केल्यानंतर बाद झाल्यानंतर दुसऱ्या डावात १०० नाबाद धावा करून पुनरागमन करण्यात यशस्वी ठरला. पॉन्टिंग म्हणाला, “विराटचा त्याच्या खेळावर विश्वास होता आणि तो पहिल्या डावाच्या तुलनेत दुसऱ्या डावात वेगळ्या खेळाडूसारखा दिसत होता. विरोधी संघाशी लढण्याऐवजी त्याने आपल्या मजबूत कौशल्यावर लक्ष केंद्रित केले. मार्नस आणि स्मिथ यांना तेच करण्याची गरज आहे. त्यामुळे मार्ग शोधा आणि दृढ निश्चय दाखवा.”

हेही वाचा – Jonny Bairstow : ६, ६, ४, ६, ४…जॉनी बेअरस्टोची तुफान फटकेबाजी! IPL 2025 च्या लिलावात अनसोल्ड राहिल्याचा काढला राग, पाहा VIDEO

गोलंदाजांवर दबाव आणण्याचा मार्ग शोधावा –

पॉन्टिंगने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अधिक जोखीम पत्करून भारतीय गोलंदाजांवर दबाव आणण्यास सांगितले. तो म्हणाला, “तुम्हाला जोखीम पत्करून गोलंदाजांवर दबाव आणण्याचा मार्ग शोधावा लागेल. कारण बुमराहसारखे गोलंदाज तुम्हाला धावा करण्याची सहज संधी देणार नाहीत, हे आपल्या सर्वांना माहीत आहे.” पहिल्या कसोटीत दणदणीत पराभव पत्करावा लागला असला तरी पॉन्टिंगने ऑस्ट्रेलियाला संघात जास्त बदल न करता या संघासह उतरण्याचा सल्ला दिला. तो म्हणाला, “मी याच संघासह उतण्याचा सल्ला देईन. मला वाटते की तुम्हाला चॅम्पियन खेळाडूंवर विश्वास असणे आवश्यक आहे आणि या संघातील बरेच लोक चॅम्पियन खेळाडू आहेत.”