scorecardresearch

उद्धव ठाकरे News

उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे ते अध्यक्ष होते. मात्र २०२२ साली पक्षात फूट पडल्यानंतर त्यांना पक्ष आणि पक्षाचे चिन्ह गमवावे लागले. उद्धव ठाकरे यांचा जन्म २७ जुलै १९६० रोजी मुंबईत झाला आणि दादरमधील बालमोहन विद्यामंदिरमधून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. जेजे स्कूल ऑफ आर्टचे पदवीधर उद्धव ठाकरे यांनी रश्मी पाटणकर यांच्याशी लग्न केले आणि त्यांना दोन मुले आहेत. त्यांचे मोठे चिरंजीव आदित्य ठाकरे हेदेखील शिवसेनेचे नेते आहेत. २०१९ मध्ये महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद भूषविले होते. उद्धव ठाकरे हे छायाचित्रकारही आहेत. त्यांची ‘महाराष्ट्र देशा’ आणि ‘पहावा विठ्ठल’ ही दोन पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.


२००२ मध्ये मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे (Shivsena) प्रचार प्रभारी बनल्यानंतर ठाकरे यांनी राजकारणात पदार्पण केले. २००३ मध्ये त्यांची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आणि २००६ मध्ये ते पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकाचे मुख्य संपादक झाले. २०१२ मध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली आणि २०१३ मध्ये ते अध्यक्षपदी विराजमान झाले. कोणत्याही सरकारमध्ये स्थान मिळवणारे ठाकरे कुटुंबातील ते पहिले सदस्य ठरले. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.


२०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड पुकारून स्वतःबरोबर पक्षाचे ४० हून अधिक आमदार आणि १३ खासदारांसह शिवसेना पक्ष ताब्यात घेतला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी रस्त्यावर आणि न्यायालयात संघर्ष करत कडवी झुंज दिली. पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्यानंतरही २०२४ च्या निवडणुकीत शिवसेना उबाठा गटाने नऊ जागांवर विजय मिळविला. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सात जागा मिळाल्या.


Read More
mla ameet satam
“शिवसेनेतले निष्ठावंत का पळाले याचा उद्धव ठाकरे यांनी विचार करावा”, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचा टोला

‘ईव्हीएम’च्या रडगाण्याला मतदार आता कंटाळलेत, असाही खोचक सल्ला साटम यांनी ठाकरे बंधूंना दिला आहे.

maharashtra dream fulfilled banner mns unity raj uddhav balasaheb thane political symbolism
“महाराष्ट्राचं स्वप्न साकार झालं” ठाण्यातील मनसेच्या बॅनरची चर्चा…

MNS Raj Thackeray Uddhav Thackeray : ठाण्यातील नितीन कंपनी चौकात “महाराष्ट्राचं स्वप्न साकार झालं” या आशयाचा मनसेचा फलक सध्या चर्चेत…

Eknath Shinde Slam Uddhav thackeray Over Anaconad Remerak
“भस्म्या झालेला ॲनाकोंडा”, उद्धव ठाकरेंच्या अमित शाहांवरील टीकेला एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर; वाचून दाखवली घोटाळ्यांची यादी

अमित शाहांवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Uddhav Thackeray news in marathi
सरकारकडून मतदारांची निवड- उद्धव ठाकरे; बोगस मतदार शोधण्याचे शिवसेना कार्यकर्त्यांना आदेश

लोकशाहीत मतदार सरकार निवडतात, पण आताची परिस्थिती अशी आहे की सरकार मतदार निवडत आहे, कुणी मतदान करायचे कुणी नाही,

Chandrashekhar-Bawankule-Uddhav-Thackeray
Bawankule On Thackeray : उद्धव ठाकरेंनी अमित शाहांचा अ‍ॅनाकोंडा उल्लेख केल्याने बावनकुळे संतापले; म्हणाले, “अजगरानं स्वतःच्या…”

भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवर पोस्ट करत उद्धव ठाकरे यांचा उल्लेख अजगर असा केला. त्यामुळे आता भाजपा आणि ठाकरे…

Uddhav-Thackeray-Full-Speech
Uddhav Thackeray : निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना उद्धव ठाकरेंचा मोठा इशारा; म्हणाले, “आमचं सरकार आल्यानंतर…”

राज्यातील आणि देशभरातील मतदार याद्यामधील घोळांबाबत आणि बोगस मतदाराच्या मुद्यांवरून उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली.

Uddhav-Thackeray-Narendra-Modi-Amit-Shah
Uddhav Thackeray : “मुंबईवर दोन व्यापाऱ्यांचा डोळा”, उद्धव ठाकरे यांची मोदी आणि शाहांवर जोरदार टीका

मुंबईवर दोन व्यापाऱ्यांचा डोळा असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी जोरदार घणाघात केला. एवढंच नाही तर उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांचा…

Shiv Sena Uddhav Thackeray against voter fraud
ठाकरे गटाचेही ‘लाव रे तो व्हिडिओ’; आदित्य ठाकरेंनी मतचोरीविरोधातील सादरीकरणावेळी काय दाखवले?

Voter List Irregularities Maharashtra: राज्यात येत्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार…

Sanjay-Raut-On-Chandrashekhar-Bawankule
Sanjay Raut : ‘चंद्रशेखर बावनकुळेंना तातडीने अटक करा’, ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; राजकारणात खळबळ

‘सर्वांचे मोबाईल व व्हॉट्सअ‍ॅप सर्वेलन्सवर टाकले आहेत’, असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनीगुन्हा दाखल…

महाराष्ट्र न्यूज
Maharashtra News Highlights: “ऑडिटमध्ये फेल झालेल्या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवणार का?”, रोहित पवारांचा महायुती सरकारला सवाल

Maharashtra News Highlights: राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडींचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माघ्यमातून घेऊयात.

ताज्या बातम्या