scorecardresearch

उद्धव ठाकरे News

उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) हे भारतीय राजकारणी आणि महाराष्ट्राचे १९ वे मुख्यमंत्री आहेत. त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे ते अध्यक्ष देखील आहेत. उद्धव ठाकरे यांचा जन्म मुंबईत झाला आणि महाराष्ट्रातील बालमोहन विद्यामंदिरमधून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. त्यांना दोन भाऊ असून राज ठाकरे चुलत भाऊ आहेत. ठाकरे यांचा जन्म २७ जुलै १९६० रोजी झाला.


जमशेटजी जीजेभॉय स्कूल ऑफ आर्टचे पदवीधर उद्धव ठाकरे, यांनी रश्मी पाटणकर यांच्याशी लग्न केले आणि त्यांना दोन मुले आहेत. त्यांचा मोठा मुलगा आदित्य ठाकरे हे देखील शिवसेनेचे नेते आहेत आणि सध्या ते महाराष्ट्र सरकारचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री म्हणून काम पाहत आहेत. उद्धव ठाकरे हे निपुण छायाचित्रकार आहेत. त्यांची ‘महाराष्ट्र देशा’ आणि ‘पहावा विठ्ठल’ ही दोन पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.


२००२ मध्ये मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे (Shivsena) प्रचार प्रभारी बनल्यावर ठाकरे यांनी राजकीय पदार्पण केले आणि पक्षाचा विजय झाला. २००३ मध्ये त्यांची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आणि २००६ मध्ये ते त्यांच्या पक्षाचे राजकीय मुखपत्र सामनाचे मुख्य संपादक झाले. त्याच वर्षी राज ठाकरे यांनी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. २०२१ मध्ये वडिलांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली आणि २०१३ मध्ये अध्यक्षपदी विराजमान झाले. कोणत्याही सरकारमध्ये स्थान मिळवणारे ते ठाकरे कुटुंबातील पहिले सदस्य ठरले. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.


Read More
MP Nagesh Patil Ashtikar
खासदारकीची शपथ घेताना बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण; लोकसभा अध्यक्षांनी नागेश पाटील आष्टीकरांना रोखलं, नेमकं काय घडलं?

लोकसभेचे हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब हे नवनिर्वाचित खासदारांना शपथ देत आहेत.

Ambadas Danve On NCP Ajit Pawar group
अंबादास दानवेंचं अजित पवार गटाबाबत मोठं विधान; म्हणाले, “अर्ध्या लोकांचा महायुतीला…”

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासंदर्भात मोठं विधान केलं आहे.

Shrikant Shinde on Aditya Thackeray
“वरळीत पुन्हा निवडणुकीला उभे राहतात की घाबरून…”, श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंना टोला

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या टिकेला शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले.

kolhapur uddhav thackeray shivsena
कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये शिवसेनेची मशालच पाहिजे; शिवसैनिकांचा आग्रह

कोल्हापूर उत्तर या मतदारसंघात गेले दोन वेळा काँग्रेसचा उमेदवार निवडून आले आहेत. पण आता या मतदारसंघावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने…

nilesh lanke
उद्धव ठाकरेंशी झालेल्या भेटीनंतर निलेश लंकेंनी केला निर्धार; म्हणाले, “नगर जिल्ह्यात…”

लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर निलेश लंके यांनी आज ‘मातोश्री’ या निवासस्थानी जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी…

kolhapur shivsena morcha marathi news
गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी कार्यालयावर ठाकरेसेनेचा मोर्चा, आंदोलक- पोलिसांत शाब्दिक चकमक

आंदोलकांनी प्रांत कार्यालय परिसरात ठिय्या मारला. यावेळी आंदोलक आणि पोलीस यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.

amruta fadnavis uddhav thackeray
“टीका करणारे…”, अमृता फडणवीसांचं उद्धव ठाकरेंच्या ‘वाजवले की बारा’ टीकेवर सूचक विधान; म्हणाल्या, “सत्ताधारी किंवा विरोधकांना…”

योगदिनाच्या निमित्ताने अमृता फडणवीस म्हणाल्या, “हा एक सुंदर दिवस आहे. मी सत्ताधारी किंवा विरोधकांना एवढीच प्रार्थना करेन की…”

What Amit Thackeray Said?
‘बिनशर्ट’च्या वक्तव्यावर अमित ठाकरेंचं काका उद्धव ठाकरेंना उत्तर, “राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिल्याने ज्यांचा मुलगा..”

राज ठाकरेंनी आपल्या मेहनतीवर पक्ष काढला आहे हे कुणीही विसरु नये असाही टोला अमित ठाकरेंनी लगावला.

It has been two years since the split in Shiv Sena
शिवसेनेतील फुटीला दोन वर्षे पूर्ण; निवडणुकीत ठाकरे गट वरचढ

विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीची मतमोजणी सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांनी १६ आमदारांसह सुरत गाठले आणि शिवसेना विधिमंडळ पक्षात उभी फूट…

arvind sawant
“निर्लज्जम सदा सुखी… गद्दार तर गद्दारच राहतो”, अरविंद सावंत यांची मुख्यमंत्र्यांवर टीका; म्हणाले…

गद्दार कायम गद्दार असतो आणि पळपुट्यांची पळपुटे अशीच नोंद होते, याचे भान त्यांनी ठेवणे आवश्यक आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे…

ताज्या बातम्या