scorecardresearch

उद्धव ठाकरे Videos

उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) हे भारतीय राजकारणी आणि महाराष्ट्राचे १९ वे मुख्यमंत्री आहेत. त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे ते अध्यक्ष देखील आहेत. उद्धव ठाकरे यांचा जन्म मुंबईत झाला आणि महाराष्ट्रातील बालमोहन विद्यामंदिरमधून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. त्यांना दोन भाऊ असून राज ठाकरे चुलत भाऊ आहेत. ठाकरे यांचा जन्म २७ जुलै १९६० रोजी झाला.


जमशेटजी जीजेभॉय स्कूल ऑफ आर्टचे पदवीधर उद्धव ठाकरे, यांनी रश्मी पाटणकर यांच्याशी लग्न केले आणि त्यांना दोन मुले आहेत. त्यांचा मोठा मुलगा आदित्य ठाकरे हे देखील शिवसेनेचे नेते आहेत आणि सध्या ते महाराष्ट्र सरकारचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री म्हणून काम पाहत आहेत. उद्धव ठाकरे हे निपुण छायाचित्रकार आहेत. त्यांची ‘महाराष्ट्र देशा’ आणि ‘पहावा विठ्ठल’ ही दोन पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.


२००२ मध्ये मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे (Shivsena) प्रचार प्रभारी बनल्यावर ठाकरे यांनी राजकीय पदार्पण केले आणि पक्षाचा विजय झाला. २००३ मध्ये त्यांची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आणि २००६ मध्ये ते त्यांच्या पक्षाचे राजकीय मुखपत्र सामनाचे मुख्य संपादक झाले. त्याच वर्षी राज ठाकरे यांनी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. २०२१ मध्ये वडिलांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली आणि २०१३ मध्ये अध्यक्षपदी विराजमान झाले. कोणत्याही सरकारमध्ये स्थान मिळवणारे ते ठाकरे कुटुंबातील पहिले सदस्य ठरले. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.


Read More
Sanjay Rauts prediction in the background of Lok Sabha elections
Sanjay Raut: “निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे…”, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राऊतांची भविष्यवाणी!

ठाकरे गटाचे खासदार प्रचारानिमित्त जळगावमध्ये आहेत. यावेळेस आगामी लोकसभा निवडणुकांबाबत बोलत असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका केली.…

loksatta editor in chief girish kupers explained on maharashtra loksabha election
Girish Kuber on Lok sabha 2024: शिंदे, ठाकरे ते पवार खरी कसोटी कोणाची? गिरीश कुबेर यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. सर्वच पक्ष शक्तीप्रदर्शन करून प्रचारसभा गाजवत आहेत. मात्र यंदाची ही निवडणूक थोडी वेगळी ठरणार…

Uddhav Thackeray criticized BJP by mentioning web series over loksabha elaction 2024
Uddhav Thackeray on BJP: “अभिनेता तोच, खलनायक तोच”, वेब सिरीजचा उल्लेख करत ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

उद्धव ठाकरेंनी परभणीतल्या सभेत भर पावसातही भाजपा आणि मोदी शाह यांच्यावर जोरदार टीका केली. “मी वादळात उभा राहणार आहे, संकटांना…

Devendra Fadnavis criticizes Congress and Thackeray group from a meeting in Vardha loksabha election
Devendra Fadnavis On Congress: वर्ध्यामधील सभेतून देवेंद्र फडणवीसांची काँग्रेस आणि ठाकरे गटावर टीका!

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी वर्ध्यामधील महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेचे आयोजन…

dcm devendra fadnavis slams the sharad pawar and uddhav thackeray
Devendra Fadnavis in Yavatmal: देवेंद्र फडणवीसांचा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा

यवतमाळ-वाशिम लोकसभा महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील (महल्ले) यांच्या प्रचारार्थ राळेगाव, यवतमाळ येथे रविवारी (२१ एप्रिल) जाहीर सभा पार पडली.…

Election Commission notice to Thackeray group showing To video of Modi-Shah Thackerays question
Uddhav Thackeray: ठाकरे गटाला निवडणूक आयोगाची नोटीस, मोदी-शाहांचे ‘ते’ व्हिडीओ दाखवत ठाकरेंचा सवाल!

लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाला निवडणूक आयोगानं नोटीस पाठवली आहे. ठाकरे गटानं गेल्या आठवड्यात लाँच…

Devendra Fadnavis wanted to be a minister at the centre what exactly did Uddhav Thackeray say
Uddhav Thackeray: देवेंद्र फडणवीसांना केंद्रात मंत्री व्हायचं होतं? उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता, असा दावा उद्धव ठाकरेंनी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या वादाला…

Sanjay Rauts secret blast about Devendra Fadnavis
Sanjay Raut on Fadnavis: “आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करून…”, राऊतांचा फडणवीसांबाबत गौप्यस्फोट!

उद्धव ठाकरेंनी अमित शाहांच्या शब्दानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी आदित्यला मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता, असा नवा दावा केला आहे.…

Sanjay Rautas statement on the Prime Ministers candidature
Sanjay Raut on Uddhav Thackeray: “जर संधी मिळाली.” पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचं विधान

उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीतून पंतप्रधानपदाचा चेहरा असतील का? असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी खासदार संजय राऊतांना विचारला. त्यावर त्यांनी का असू…

ताज्या बातम्या