Budh Margi 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे राजकुमार बुध एका ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करतात आणि स्थितीमध्ये बदल करतात. १६ डिसेंबर २०२४ च्या रात्री १ वाजून ५२ मिनिटांनी वृश्चिक राशीमध्ये मार्गी होणार आहे.
बुधच्या सरळ चालीमुळे काही राशींच्या लोकांना लाभ मिळू शकतो तर काही राशींच्या लोकांनी काळजी घेण्याची गरज भासू शकते. बुध ग्रहाच्या वृश्चिक राशीमध्ये मार्गी झाल्यामुळे काही राशींना भरपूर लाभ मिळू शकतो. बुध हा व्यवसाय, ट्रेड, बौद्धिक क्षमता, एकाग्रता, बुद्धी, तर्क वितर्काचा कारक मानला जातो. अशात बुध ग्रहाच्या स्थितीमध्ये बदल काही राशींच्या लोकांना फायदेशीर ठरू शकतो. आज आपण कोणत्या राशींना फायदा होणार, याविषयी जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : २७ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; शनी-बुधाची केंद्र दृष्टी देणार भरपूर पैसा

वृषभ राशी (Vrishabha Zodiac)

या राशीमध्ये बुध ग्रह सातव्या भावात मार्गी करणार आहे. अशात या राशीच्या लोकांना भरपूर लाभ मिळू शकतो. हे लोक खूप जास्त धन कमावण्यात यशस्वी होऊ शकतात. तसेच घर कुटुंबात चांगला वेळ घालवू शकतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लोकांना यश मिळू शकते. बुध ग्रहाच्या कृपेने विदेशात नोकरी आणि शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. तसेच जीवनात नवीन सुरुवात होऊ शकते. आर्थिक स्थिती मजबूत होईल. दीर्घ काळापासून सुरू असलेली पैशांची अडचण दूर होईल. व्यवसायात नफा मिळणार. समाजात मान सन्मान मिळणार.

कन्या राशी (Kanya Zodiac)

कन्या राशीमध्ये बुध तिसर्‍या स्थानावर मार्गी करणार आहे. अशात या राशीच्या लोकांना भरपूर लाभ मिळू शकतो. तसेच या लोकांना प्रवासाचे योग येतील. या दरम्यान या लोकांनी अनेक नवीन लोकांबरोबर भेटी गाठी होईल, ज्यामुळे या कन्या राशीच्या लोकांची प्रगती होऊ शकते. करिअरच्या क्षेत्रात नवीन नोकरी करण्याची संधी मिळू शकते. विदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. दीर्घ काळापासून अडकलेले काम पूर्ण होतील. कुटुंबात सुरू असलेल्या समस्या आता समाप्त होऊ शकतात. नोकरीमध्ये लाभ मिळू शकतात आणि चांगली प्रगती होऊ शकते. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना यश प्राप्त होऊ शकते. पैसा कमावण्याचे नवीन स्त्रोत उघडणार. तसेच बचत करण्यात यशस्वी होतील. भाऊ बहि‍णीच्या नात्यात सलोखा वाढेन. लव्ह लाइफ आणि दांपत्य जीवनात आनंद दिसून येईल.

हेही वाचा : Surya Gochar 2025 : १५ डिसेंबरपासून करोडपती होऊ शकतात ‘या’ तीन राशींचे लोक; सूर्यदेवाच्या कृपेने जगू शकतात राजासारखे जीवन?

मकर राशी (Makar Zodiac)

या राशीमध्ये बुध अकराव्या स्थानात मार्गी होणार आहे. अशात या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. या राशीच्या लोकांना भरपूर यशाबरोबर धन लाभ मिळू शकतो. या लोकांच्या आत्मविश्वासात वृद्धी होऊ शकते. विदेशात नोकरी करण्याची संधी मिळू शकते. याचा फायदा या लोकांना होईल. मेहनत आणि कामाला पाहून कौतुक होऊ शकते. विदेशात कोणत्याही कामामुळे धन लाभ मिळू शकतो.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Budh margi 2024 three lucky zodiac signs get money and wealth ndj