Daily Horoscope In Marathi , 3 May 2025 : ३ मे २०२५ रोजी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी आहे. षष्ठी तिथी सकाळी ७ वाजून ५३ मिनिटांपर्यंत राहील; त्यानंतर सप्तमी तिथी सुरु होईल. पुनर्वसु नक्षत्र दुपारी १२ वाजून ३४ मिनिटांपर्यंत जागृत असेल. त्रिपुष्कर योग १२ वाजून ३४ मिनिटांपर्यंत जुळून येईल. राहू काळ ९ वाजता सुरु होईल ते १०: ३० मिनिटांपर्यंत असणार आहे. गंगा नदी ही हिंदू धर्मातील सर्वात पवित्र नदी आहे. असे म्हटले जाते की वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सप्तमी दिवशी गंगा नदीचा पुनर्जन्म झाला. म्हणून, दरवर्षी वैशाख महिन्याच्या या तारखेला गंगा सप्तमी उत्सव साजरा केला जातो. या वर्षी गंगा सप्तमी ३ मे २०२५ रोजी येत आहे. तर आज गंगा सप्तमी तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी घेऊन येणार का जाणून घेऊया…

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

३ मे पंचांग व राशिभविष्य (Aajche Rashi Bhavishya, 3 May 2025)

आजचे मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope in Marathi)

दिवसभर कामाची धावपळ राहील. अती श्रमामुळे थकवा जाणवेल. काही अडचणीतून मार्ग काढता येईल. बदलांकडे सकारात्मकतेने पहावे. घरगुती वातावरण चांगले राहील.

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope in Marathi)

वैचारिक दृष्टिकोन बदलून पाहावा. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. गुरुकृपेचा लाभ उठवावा. तीर्थयात्रेचे योग येतील. दिवस खेळीमेळीत घालवाल.

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope in Marathi)

मुलांची चिंता लागून राहील. स्त्री वर्गापासून दूर राहावे. लबाड लोकांची संगत टाळावी. गुंतवणुकीचा पुनर्विचार करावा. आर्थिक व्यवहार सावधानतेने करावेत.

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope in Marathi)

जोडीदाराशी मतभेद संभवतात. मनाची चंचलता टाळण्याचा प्रयत्न करा. अती भावनाविवश होऊ नका. जुन्या गोष्टी उगाळत बसू नये. लहानांच्यात लहान होऊन वावराल.

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope in Marathi)

पोटाची काळजी घ्यावी. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. कलेला पोषक वातावरण मिळेल. गोड बोलून फायदा साधून घ्याल. कमिशन मधून चांगली कमाई होईल.

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope in Marathi)

मुलांना काही नवीन गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करावा. मतभेदाला खतपाणी घालू नका. नातेवाईकांशी सलोख्याचे संबंध ठेवावेत. छुप्या शत्रूंचा विरोध मावळेल. जोडीदाराची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करावा.

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope in Marathi)

मुलांच्या धडपडीकडे लक्ष ठेवावे. क्रोधाला बळी पडू नका. कौटुंबिक नैराश्य दूर करण्याचा प्रयत्न करावा. नवीन गुंतवणूक सावधानतेने करावी. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो.

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope in Marathi)

प्रवासात क्षुल्लक अडचण येऊ शकते. वाहन चालवताना सतर्कता बाळगावी. पत्नीचे मत विरोधी वाटेल. भावंडांचे प्रश्न भेडसावतील. कौटुंबिक सहलीचा विचार करावा.

आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope in Marathii)

कौटुंबिक खर्च वाढेल. हाताखालील लोक विश्वासू मिळतील. इतरांचा विश्वास संपादन करावा. मत्सराला बळी पडू नका. कामाच्या ठिकाणी समाधान लाभेल.

आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope in Marathi)

नवीन विचारांची कास धरावी. तिखट व तामसी पदार्थ आवडीने खाल. स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल. घरात तुमचा दबदबा राहील. करमणुकीच्या कार्यक्रमात गुंग व्हाल.

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope in Marathi)

शांत व संयमी विचार करावा. घरगुती वातावरण प्रसन्न राहील. मनाची चंचलता दूर करावी. धार्मिक स्थळांना भेट द्याल. आध्यात्मिक बळ वाढवावे.

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope in Marathi)

प्रकृतीच्या बाबतीत हयगय करू नका. सामुदायिक वादात लक्ष घालू नका. मनातील इच्छा पूर्ण होईल. स्त्रियांमुळे मतभेद संभवतात. अती चौकसपणा दर्शवू नका.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganga saptami on 3 may 2025 todays horoscope predictions for all 12 zodiac signs in marathi vnk 50 asp