Numerology : अंकशास्त्रानुसार व्यक्तीवर अंकाचा विशेष प्रभाव पडतो. कारण व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार त्या व्य्तीचा मूलांक तयार होतो आणि या मूलांकचा थेट संबंध कोणत्या ग्रहाशी होत असतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व हे वेगवेगळे असते. आज आपण मूलांक ६ असणाऱ्या लोकांविषयी जाणून घेणार आहोक. यांचा ग्रह शुक्र असतो.

कोणत्याही महिन्याच्या ६, १५, आणि २४ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ६ असतो. हे लोक नात्यात प्रामाणिक आणि खरे असतात. हे कोणतेही नाते खूप प्रामाणिकपणे पूर्ण निभवतात आणि समोरच्या व्यक्तीकडून सुद्धा हीच अपेक्षा ठेवतात.आज आपण या विषयी सविस्तर जाणून घेऊ या.

नातेसंबंधात प्रामाणिक राहतात

अंकशास्त्रानुसार मूलांक ६ असलेले लोक प्रामाणिक असतात. त्याचबरोबर हे लोक त्यांचे नाते अतिशय प्रामाणिकपणे निभवतात. या लोकांना लवकर राग येत नाही पण जेव्हा येतो तेव्हा राग येतो तेव्हा अतिशय तीव्र स्वरूपाचा येतो. हे लोक त्यांच्या जोडीदाराला नेहमी आनंदी ठेवण्याचा विचार करतात आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतात. हे लोक थोडे मूडी सुद्धा असतात पण प्रेमसंबंध आणि वैवाहिक आयुष्यात नाते खूप मनापासून जपतात. हे लोक जोडीदाराला कधीही फसवत नाही.

हेही वाचा : Guru Gochar 2024 : १ मे पासून बदलणार ‘या’ राशींचे नशीब, गुरू गोचर देणार बक्कळ पैसा

कला प्रेमी असतात

मूलांक ६ असलेल्या लोकांना कलेची जाण असते आणि ते कलाप्रेमी असतात. त्याचबरोबर या लोकांना संगीत ऐकण्याची आवड असू शकते. या लोकांना चांगले कपडे परिधान करण्याची आवड असते.हे लोक प्रत्येक परिस्थितीमध्ये उत्तम राहतात. हे लोक टेन्शन देत नाही आणि टेन्शन घेत नाही. हे लोक चांगले मित्र सुद्धा असतात आणि मैत्रीचे नाते मनापासून जपतात. मूलांक ६ असलेले लोक मजेशीर स्वभावाचे असतात. त्याचबरोबर या लोकांमध्ये जिद्द असते. एखादी गोष्ट जर त्यांनी ठरवली तर ते कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करतात.

या क्षेत्रात कमवतात नाव आणि पैसा

मूलांक ६ असलेल्या लोकांच्या करिअरचा विचार केला तर हे लोक कला, मॉडलिंग, चित्रपट, फॅशन डिझाइनिंगच्या क्षेत्रात जास्त नाव आणि पैसा कमावू शकतात.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)