Shani Margi 2024: ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते. सूर्याचे प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन होते. कुंडलीत सूर्य शुभ असेल, तर व्यक्तीला आयुष्यात आत्मविश्वास, यश, मान-सन्मान, पैसा, पद यांसारख्या बऱ्याच गोष्टी प्राप्त होतात. नुकत्याच काही दिवसांपूर्वी म्हणजेच १६ नोव्हेंबर रोजी सूर्याने वृश्चिक राशीत प्रवेश केला. तसेच १५ नोव्हेंबर रोजी शनी आपल्या मूळ त्रिकोण राशी असलेल्या कुंभ राशीत मार्गी झाला. या दोन्ही ग्रहांचे परिवर्तन जवळपास एकाच काळात झाले. ज्याचा काही राशींवर शुभ प्रभाव पडेल. त्या राशींच्या आयुष्यात सुख-समृद्धी आणि शांती येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूर्य-शनी करणार ‘या’ तीन राशींवर कृपा

मेष

मार्गी शनी आणि सूर्याच्या राशी परिवर्तनाने मेष राशीच्या व्यक्तींचा भाग्योदय होईल. मेहनत केलेल्या कामात हवे तसे यश मिळविता येईल. आर्थिक परिस्थिती उत्तम होईल. करिअर आणि व्यवसायात मानासारखे यश प्रस्थापित कराल. अडकलेले पैसे परत मिळतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. समाजात मान-सन्मान वाढेल.

वृषभ

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठीही हा बदल खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात समस्यांपासून सुटका होईल. ताणतणाव दूर होण्यास मदत होईल, मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. तूळ राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. वाहन, मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण कराल. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आरोग्य चांगले राहील. कुटुंबीयांचे संबंध चांगले होतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता.

हेही वाचा: महालक्ष्मी योग देणार बक्कळ पैसा; दोन दिवसानंतर ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार सुखाचे क्षण

कन्या

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी देखील हा बदल सकारात्मक परिणाम देणारा ठरेल. या काळात भौतिक सुखाची प्राप्ती होईल. नवीन कार्य सुरू करण्यासाठी अनुकूल काळ आहे. वैवाहिक जीवन सुखमय असेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. तुमच्या साहस आणि पराक्रमात वाढ होईल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी नोकरी मिळेल. विवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani margi and surya gochar 24 these three signs will shine and wealth will increase sap