06 August 2020

News Flash

Ishita

‘वाहतूक नियमांचा अभ्यासक्रमात समावेश व्हावा’

एकीकडे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करताना दुसऱ्याची गैरसोय होते, हे ध्यानात घेतले पाहिजे. वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून आपण दुसऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरू नये असे आवाहन करताना, वाहतूक नियमांचा समावेश अभ्यासक्रमात झाल्यास समाजामध्ये विशेषत: भावी पिढीमध्ये वाहतूक नियमांबाबत साक्षरता निर्माण होईल, असा विश्वास कराड विभागीय पोलीस अधिकारी मितेश घट्टे यांनी व्यक्त केला.

सोलापूर जिल्ह्य़ात ४.८० लाख बालकांना पल्पपोलिओची लस

राष्ट्रीय पल्सपोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत सोलापूर शहर व जिल्ह्य़ात चार लाख ८० हजार बालकांना पोलिओ लस देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सुनील भडकुंबे यांनी दिली.

‘जनसुराज्य शक्ती’कडून बोगस लाभार्थीच्या चौकशीची मागणी

प्रशिक्षणाच्या नावाखाली तीन वर्षांत पावणेदोन कोटी रुपयांचा खर्च करून त्याचे फलित काय साध्य झाले, याचा लाभ घेतलेल्या बोगस लाभार्थीची चौकशी व्हावी, या मागणीसाठी गुरुवारी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक पी. बी. पाटील यांना तासाहून अधिक काळ धारेवर धरले. त्यावर पाटील यांनी महिन्याभरात यासंदर्भातील अहवाल कार्यकर्त्यांना दिला जाईल, असे आश्वासन दिले.

कोल्हापुरात रंगला फुटबॉल सामना

येथे गुरुवारी झालेल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनीय फुटबॉल सामन्यात नेदरलँडने भारतीय संघावर २ विरुद्ध शून्य गोलने विजय मिळविला. भारतीय महिला फुटबॉलपटूंनी चांगला खेळ करूनही उंच्यापुऱ्या नेदरलँडच्या खेळाडूंसमोर त्यांचा निभाव लागला नाही. शाहू स्टेडियमवर झालेल्या या सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी २५ हजारांहून अधिक फुटबॉलप्रेमी नागरिकांनी गर्दी केली होती. कोल्हापूरकरांचे फुटबॉलप्रेम सर्वश्रुत आहे.

यंत्रमाग कामगारांच्या प्रश्नी आज पुन्हा बैठक

यंत्रमाग कामगारांच्या प्रश्नाबाबत बुधवारी मुंबईत मंत्रालयात झालेल्या बैठकीत तोडगा न निघाल्याने आता उद्या शुक्रवारी कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहामध्ये पुन्हा एकदा बैठक होत आहे. कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सलग दुसऱ्या बैठकीत निर्णय होतो का याकडे लक्ष वेधले आहे.

पाचवे समतावादी साहित्य संमेलन २ व ३ फेब्रुवारी रोजी निपाणीमध्ये

समतावादी सांस्कृतिक चळवळीचे पाचवे समतावादी साहित्य संमेलन येत्या २ व ३ फेब्रुवारी रोजी निपाणी (जि. बेळगाव) येथे आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती समतावादी सांस्कृतिक चळवळीचे प्रमुख प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी दिली.
आमदार काकासाहेब पाटील हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत.

सोलापुरात २२पासून तीन दिवस कृषी विज्ञान तंत्रज्ञान महोत्सव

नवी दिल्लीची भारतीय कृषी अनुसंधान परिषद पुरस्कृत व सोलापूरच्या शबरी कृषी प्रतिष्ठान संचलित कृशी विज्ञान केंद्रांच्या वतीने येत्या २२, २३ व २४ जानेवारी रोजी कृषी विज्ञान तंत्रज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर विद्यापीठाजवळ हिरज गावच्या शिवारात आयोजित या महोत्सवात दुष्काळग्रस्त सोलापूर जिल्हय़ातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशा प्रकारची कमी पाण्यावरील आधुनिक व सुधारित शिफारशींवर आधारित ६३ कृषी तंत्रज्ञान प्रात्यक्षिके पाहावयास मिळणार आहेत. याशिवाय विविध सात चारा पिकांच्या बारा वाणांची लागवडही पाहावयास मिळणार आहे.

सोलापुरात आजपासून तीन दिवस सुशील करंडक राज्य एकांकिका स्पर्धा

अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या सोलापूर शाखेच्या वतीने सुशील करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धाना उद्या शुक्रवारपासून सोलापूरच्या हुतात्मा स्मृतिमंदिरात प्रारंभ होत आहे. या एकांकिका स्पर्धेत २१ एकांकिका सादर केल्या जाणार आहेत. स्पर्धेचे यंदाचे पाचवे वर्ष आहे.

अरुणा आदोने यांचे निधन

शहरातील गुरुवार पेठेतील के. व्ही. आदोने ड्रेसेसचे चालक नागनाथ आदोने यांच्या पत्नी अरुणा नागनाथ आदोने (वय ५५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन पुत्र, एक कन्या, बंधू असा परिवार आहे.

पालिका परिवहनच्या १३४ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यास नकार

सोलापूर महापालिका परिवहन विभागातील १३४ रोजंदारी कामगारांची सेवेत कायम करण्याची मागणी सोलापूरच्या औद्योगिक न्यायालयाने फेटाळून लावली. या निकालामुळे अगोदरच आर्थिकदृष्टय़ा डबघाईला आलेल्या परिवहन विभागाला दिलासा मिळाला तर संबंधित रोजंदारी कामगारांना चपराक मिळाली आहे.

अभिजित बोरगुले याची निवड

गोखले महाविद्यालयातील आमदार दिलीपराव देसाई डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅन्ड मॅनेजमेंट विभागाचा विद्यार्थी अभिजित बोरगुले याची दक्षिण कोरियातील चोन्नम नॅशनल युनिव्हर्सिटी येथे ‘एम्बेडेड इमेज सिस्टिम’ या विषयातील एम.एस.प्लस पीएच.डी. या संयुक्त अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे.

एशियाटिक टेक्स्टाईल पार्कसाठी केंद्राकडून चार कोटी उपलब्ध

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पुढाकारातून सोलापुरात उभारण्यात येत असलेल्या एशियाटिक टेक्स्टाईल पार्क प्रकल्पासाठी केंद्र सरकारने चार कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती प्रकल्पाचे प्रमुख अनिल पल्ली यांनी सांगितली.
या एशियाटिक टेक्स्टाईल पार्क प्रकल्पाची किंमत ३३० कोटींची आहे. त्यापैकी १०१ कोटी खर्च करून विविध पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.

शरद पवार अकलूजमध्ये प्रथमच दुष्काळी स्थितीचा आढावा घेणार

सोलापूर जिल्हय़ातील भीषण दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे येत्या शुक्रवारी प्रथमच अकलूज येथे येणार आहेत. सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यालयात आयोजित बैठकीत शरद पवार हे दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन रविवारी कराडमध्ये

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे २३वे दक्षिण महाराष्ट्र संमेलन येत्या रविवारी (दि. २०) कराड येथे होत आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांची निवड करण्यात आली असून, ज्येष्ठ नाटककार प्रा. गो. पु. देशपांडे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. अशी माहिती दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे कार्यवाह गोविंद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. साहित्य सभेचे अध्यक्ष विजय चोरमारे उपस्थित होते.

कोल्हापुरात उद्यापासून बांधकामविषयक प्रदर्शन

पश्चिम महाराष्ट्रातील बांधकामविषयक प्रदर्शन ‘दालन २०१३’चे आयोजन १८ ते २१ जानेवारी या कालावधीत शाहूपुरी जिमखाना येथे करण्यात आले आहे. क्रिडाई कोल्हापूर या संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षांचे औचित्य ठेवून आठवे दालन भरविले जात आहे, अशी माहिती क्रिडाईचे सभापती सूरज होसमनीव समन्वयक महेश यादव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

सा. रे. पाटील यांना थोरात स्मृती पुरस्कार

येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आ. डॉ. अप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांना संगमनेर येथील अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था अमृतनगर या संस्थेचा ‘स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार’ सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात होते.

‘महाराष्ट्रातील ७५ लाख विद्यार्थ्यांनी घेतला एमएससीआयटी कोर्सचा लाभ’

आंतरराष्ट्रीय दर्जा आणि जागतिक पातळीवर शिकवला जाणारा एमएससीआयटी हा ९ वर्षांत महाराष्ट्रातील ७५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी अनुभवलेला एकमेव कोर्स आहे. डिजिटल युगात आज मोबाईलच्या स्क्रीनपासून टीव्हीच्या स्क्रीनपर्यंत सगळय़ांच्या जीवनात डिजिटल तंत्रज्ञानाने प्रवेश केला आहे. घरातील प्रत्येक गोष्ट डिजिटल होत असल्याचे विवेक सावंत यांनी सांगितले.

ज्योत मशाल व्हावी अन् दामिनी सशक्त व्हावी… शोभेच्या दारूकामाद्वारे जनप्रबोधन

उंच आकाशामध्ये झेपावत फुटणारे औटगोळे, त्यातून प्रकट होऊन काही क्षणात लुप्त होणारे रंगीबेरंगी तारे, तारामंडल, म्हैसूर कारंजे, धबधबे आदी पारंपरिक कृतींबरोबरच सध्या समाजात महिलांवर होणारे अत्याचार, विशेषत: नवी दिल्लीत धावत्या बसमध्ये तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कारामुळे संपूर्ण देशात संतप्त प्रतिक्रिया उमटल्याच्या पाश्र्वभूमीवर ‘ज्योत मशाल व्हावी अन् दामिनी सशक्त व्हावी’ यांसारखी नेमके प्रबोधनपर संदेश देणारी घोषवाक्ये शोभेच्या दारूकामाद्वारे पाहून लाखो नेत्रांचे पारणे फिटले. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेची सांगता मंगळवारी रात्री या नयनरम्य शोभेच्या दारूकामाच्या आतषबाजीने झाली.

विवेकानंदांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त कराडमध्ये शोभायात्रा

स्वामी विवेकानंद यांच्या एकशेपन्नासाव्या जयंतीवर्षांच्या शुभारंभानिमित्त कराड शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. स्वामी विवेकानंद सार्धशती समारोह संयोजन समितीसह अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, युवक कल्याण प्रतिष्ठान, जनकल्याण प्रतिष्ठान, सनातन संस्था तसेच शालेय विद्यार्थी शोभायात्रेत बहुसंख्येने सहभागी झाले होते.

दर्शन शहाच्या मारेक ऱ्यास अटक

पंचवीस तोळे सोन्याच्या खंडणीसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा खून करणारा आरोपी योगेश ऊर्फ चारू आनंदा चांदणे (वय २२) याला सोमवारी जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. दर्शन रोहित शहा या खून झालेल्या बालकाच्या शेजारीच चांदणे हा राहात होता. तब्बल १८ दिवसांनंतर या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यास पोलिसांना यश आले आहे.

दरमहा १० हजार वेतनासाठी यंत्रमाग कामगारांचा मोर्चा

यंत्रमाग कामगारांना दरमहा १० हजार रुपये मिळावे, या मुख्य मागणीसाठी इचलकरंजीतील यंत्रमाग कामगारांनी सोमवारी संप करून प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. संयुक्त कृती समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चाला कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १६ जानेवारी रोजी मंत्रालयात होणाऱ्या बैठकीत योग्य निर्णय न झाल्यास २१ जानेवारीपासून कामगार बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करतील, असा इशारा देण्यात आला.

शकुंतला नगरकर यांना यंदाचा शंकरराव मोहिते लावणी पुरस्कार

लावणी क्षेत्रातील उल्लेखनीय सेवेबद्दल अकलूजच्या सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या नावाने पुरस्कार यंदाच्या वर्षी प्रसिध्द लावणी कलावंत शकुंतला नगरकर यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचे यंदाचे चौदावे वर्ष आहे. येत्या १८ ते २० जानेवारीदरम्यान अकलूजमध्ये आयोजिलेल्या राज्यस्तरीय लावणी स्पर्धेत शकुंतला नगरकर यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

सोलापुरात खासगी वीज प्रकल्पात बायोगॅस टाकीचा स्फोट; तिघे ठार

सोलापूर महापालिकेच्या तुळजापूर रस्त्यावरील कचरा डेपोत खासगी तत्त्वावर उभारण्यात आलेल्या वीजनिर्मिती प्रकल्पात बायोगॅस टाकीचा स्फोट होऊन घडलेल्या दुर्घटनेत दोघा तरुण कामगारांचा मृत्यू झाला. तर अन्य पाच कामगार जखमी झाले. सोमवारी दुपारी एकच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

‘गोकुळ समृद्धीचे प्रतीक’

जिल्हय़ातील दरडोई उत्पन्न राज्यातच नव्हे तर देशात अधिक असण्याचे कारण गोकुळने या जिल्हय़ात श्वेतक्रांती घडविल्यामुळेच आहे. म्हणूनच गोकुळ समृद्धीचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन बॉर्डर बल्ड फौंडेशन, पुणे व जम्मू याचे प्रमुख अ‍ॅड. मस्जिद शेख यांनी गोकुळला दिलेल्या भेटीप्रसंगी केले. त्यांच्यासमवेत जम्मू काश्मीर सीमाभागातील जवळजवळ ३० कार्यकर्ते उपस्थित होते.

Just Now!
X