भारतीय ऑटोमोबाईल बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वेगाने वाढत आहे. पेट्रोलच्या वाढत्या किंमती पाहता अनेक कंपन्या आता भारतीय बाजारात इलेक्ट्रिक गाड्या लाँच करत आहे. आता देशातील गुजरात स्थित इलेक्ट्रिक वाहन निर्माता आर्य ऑटोमोबाईल्स लवकरच एक नवीन इलेक्ट्रिक क्रूझर मोटरसायकल, आर्य कमांडर लाँच करण्याची शक्यता आहे. कंपनीने नुकतेच या इलेक्ट्रिक क्रूझर मोटरसायकलचा टीझर रिलीज केला असून या टीझरमुळे ही मोटरसायकल चर्चेत आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या टीझरमध्ये कंपनीने मोटरसायकलच्या डिझाईनची झलक दाखवली आहे. या बाईकला राउंड हेडलॅम्प्स, उठवलेला हँडलबार, टियरड्रॉप फ्युएल टँक आणि स्प्लिट सीट देण्यात आला आहे. तसेच या इलेक्ट्रिक मोटरसायकलमध्ये ४.४ kWh क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी वापरण्यात आली आहे. ही बॅटरी ३००० वॅटच्या इलेक्ट्रिक मोटरला उर्जा देते. मोटरसायकलच्या मागील चाकावर इलेक्ट्रिक मोटर बसवण्यात आली आहे. मोटरसायकलची बॅटरी ४-५ तासांत पूर्ण चार्ज होऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे.

आणखी वाचा : स्कोडाने भारतीय बाजारात सादर केली ‘ही’ जबरदस्त कार; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

कधी होणार लाँच ?

ही क्रूझर मोटरसायकल परवडणाऱ्या किमतीत आधुनिक फीचर्ससह आणली जाणार असून ही मोटरसायकल एकूण आठ रंगांमध्ये लाँच होणार आहे. कंपनी डिसेंबर २०२२ मध्ये ही इलेक्ट्रिक क्रूझर मोटरसायकल लॉन्च करण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arya automobiles will soon launch electric in the market pdb