केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाहतूक आणि रस्ते विभाग मंत्रालयाचा कारभार हाती घेतल्यानंतर वेगाने बदल पाहायला मिळत आहेत. रस्ते निर्मिती, वाहतूक कोंडीवर पर्याय, वाहतूक नियम यासारखे अनेक बदल त्यांनी केले. त्यामुळे या मंत्रालयाच्या माध्यमातून वेगाने काम होत असल्याचं दिसत आहे. दुसरीकडे २०२१ या वर्षात देशभरात वाहतूक उल्लंघनांसाठी प्राधिकरणांनी १,८९८.७३ कोटी रुपयांची १.९८ कोटी पेक्षा जास्त चलने जारी केली आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी संसदेत दिली आहे. लोकसभेत लेखी उत्तर देताना रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, “सरकारच्या केंद्रीकृत डेटाबेसनुसार २०२१ मध्ये बेदारकपणे गाडी चालवल्याची २,१५,३२८ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तर १ जानेवारी ते १५ मार्च २०२२ या कालावधीत देशभरात वाहतुकीच्या उल्लंघनासाठी ४१७ कोटी रुपयांची ४० लाखांपेक्षा जास्त चलने जारी करण्यात आली आहेत. ३५ टक्क्यांहून अधिक चलन दिल्लीत जारी करण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गडकरींनी गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी दिल्लीत ७१,८९,८२४ चालान जारी करण्यात आली होती. दिल्लीनंतर तामिळनाडू ३६,२६,०३७ चालानसह दुसऱ्या स्थानावर आणि १७,४१,९३२ चालानसह केरळ तिसऱ्या स्थानावर आहे.

गाडीचा टायर जुना झाला की नाही? आता लगेच कळणार, CEAT नं आणलं कलर इंडिकेटर्स मार्क

रस्ता सुरक्षा सुधारण्यासाठी संसदेने ५ ऑगस्ट २०१९ रोजी मोटार वाहन (दुरुस्ती) विधेयक, २०१९ मंजूर केले होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ९ ऑगस्ट २०१९ रोजी या विधेयकाला संमती दिली.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indians fined rs 189 crore in 2021 for violating traffic rules rmt